AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : ‘फ्लोअर टेस्टआधी रोड टेस्ट द्यावी लागेल’ बंडखोरांना सूचक इशारा!

Sachin Ahir : शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी एक महत्त्वाचं विधान बंडखोर आमदारांना उद्देशून केलं आहे.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : 'फ्लोअर टेस्टआधी रोड टेस्ट द्यावी लागेल' बंडखोरांना सूचक इशारा!
सचिन अहिर काय म्हणाले?Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 27, 2022 | 9:16 AM
Share

पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर आता गेल्या 72 तासांपासून शिवेसना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी एक महत्त्वाचं विधान बंडखोर आमदारांना उद्देशून केलं आहे. फ्लोअर टेस्टआधी रोड टेस्ट द्यावी लागेल, असं म्हणत सचिन अहिर यांनी बंडखोर आमदारांना थेट इशारा दिलाय. पुण्यात शिवसैनिकांना उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केलंय. त्यामुळे आता ज्या दिवशी बंडखोर आमदार मुंबईत परततील, तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार आहेत. पण या दिवशी महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील, याचे सुतोवाचही केले जात आहेत. या दिवसासाठी शिवसैनिकांना आतापासूनच सज्ज राहण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जात आहेत.

नेमकं काय म्हणाले सचिन अहिर?

पुण्यात शिवसैनिकांना उद्देशून भाष्य करताना सचिन अहिर यांनी म्हटलंय, की…

‘माझं तर स्पष्ट म्हणणंय, पहिली फ्लोअर टेस्ट होईल तेव्हा होईल. पण पहिल्या फ्लोअर टेस्टअगोदर त्यांना रोड टेस्टदेखील करावी लागणार आहे. कदाचित ते विमान मुंबईला उतरेल. पण मुंबईला नाही उतरलं तर दुसरी जागा पुण्याची आहे. आणि पुण्याची ज्यावी रोडटेस्ट आली, तेव्हा तुम्ही आमच्यासोबत राहणार आहात की नाही, तुम्ही आमच्यासोबत ताकदीने राहणार आहात की नाही.. या भावनेतून आणि भूमिकेत सांगण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे.’

महाराष्ट्रात तणाव

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात तणाव आहे. ठिकठिकाणी बंडखोर शिवसेना नेत्यांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली. तर बहुतांश ठिकाणी बंडखोर शिवसेना आमदारांचे बॅनरही फाडण्यात आले. त्यानंतर दुसरीकडे बंडखोरांच्या समर्थनातही अनेकजण उतरल्याचं पाहायला मिळालं होतं. ठाण्यासह मुंबईतही बॅनरला बॅनरे उत्तरं दिली जात आहेत. औरंगाबादमध्येही बंडखोर आमदारांच्या समर्थनात रॅली काढण्यात आली होती.

पाहा सचिन अहिर यांचा व्हिडीओ :

सत्ता स्थापनेचा पेच..

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झालाय. महाविकास आघाडीतून बाहेर पडा, अशी मागणी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीय. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुखांना सरकार पडू नये, यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मदत घेतलीय. आता हा सगळा वाद कोर्टात पोहोचला असल्यानं महाराष्ट्राच राजकारण आता रंगतदार वळणावर पोहोचलंय. महाविकास आघाडी सरकार विरुद्ध बंडखोर आमदार, अशी थेट लढत आता राज्यात आहे.

पाहा दीपक केसरकर यांनी आज काय म्हटलं?

वाचा एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीनंतरच्या राजकीय भूकंपाचे लाईव्ह अपडेट्स : Eknath Shinde vs Shiv sena Live

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.