Deepak Kesarkar : आमदारांच्या सर्व भावना आम्ही मांडल्या उपयोग झाला नाही; आता चर्चेची दारं बंद झालीयेत – केसरकर

महाविकास आघाडीकडून 50 आमदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र फूट पडणारच नव्हती. आम्ही वेळेवेळी आमदारांच्या भावना पक्ष नेतृत्वाकडे मांडल्या मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटले आहे.

Deepak Kesarkar : आमदारांच्या सर्व भावना आम्ही मांडल्या उपयोग झाला नाही; आता चर्चेची दारं बंद झालीयेत - केसरकर
दीपक केसरकर, आमदार
Image Credit source: TV9
अजय देशपांडे

|

Jun 29, 2022 | 9:13 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी (Shiv Sena) बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. आता विरोधकांकडून अविश्वास प्रस्तावाची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी ‘टीव्ही9’ शी  बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीकडून 50 आमदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र फूट पडणारच नव्हती. आम्ही वेळेवेळी आमदारांच्या भावना पक्ष नेतृत्वाकडे मांडल्या मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आता चर्चेची सर्व दारे बंद झाली आहेत. अविश्वास ठरावासाठी आमदार 100 टक्के तयार आहेत. उगाच धमक्या देऊ नका, यातून महाविकास आघाडी सरकार लोकशाहीला पुरक नसल्याचा संदेश जातो. असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच शरद पवार यांच्यापेक्षा उद्धव (Uddhav Thackeray) ठाकरेंचं आपल्या कार्यकर्त्यांवर कमी प्रेम असल्याचे देखील केसरकर यावेळी म्हणाले.

आमदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न

यावेळी बोलताना केसरकर म्हणाले की, आमदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यात यश मिळाले नाही. जर फूट पडण्याची शक्यता असती तर आम्ही आमचे मोबाईल आमच्याकडे ठेवलेच नसते. आम्ही या काळात आमदारांच्या सर्व भावना उद्धव ठाकरेंना कळवल्या मात्र काही उपयोग झाला नाही. आता हे प्रकरण खूप पुढे गेले आहे. चर्चेची सर्व दारे बंद झाली आहेत. उगाच धमक्या देऊन नये, यातून आपण  लोकशाहीला पुरक नसल्याचा संदेश जातो. कालही आम्ही सांगितले होते,  उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत बोलणी करण्यास पुढाकार घ्यावा. मात्र त्याचा काहीही उपयोग झाल नसल्याचे केसरक यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

‘उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांवर कमी प्रेम’

उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांवर शरद पवारांपेक्षा कमी प्रेम करतात. त्यांनी कार्यकर्त्यांना थोडी जास्त आत्मीयता दाखवली असती, तर फार बरं झालं असतं. ही वेळ आज आली नसती, असे केसकर यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीनगरचा प्रस्ताव आणायला उशीर झाला. हा प्रस्ताव आधीच यायला हवा होता. आमच्या मनात ही खंत आहे. आमचे नेते मुख्यमंत्री झाले, पण आमच्या नेत्याला त्यांनी नामकरणाबाबत औरंगाबादेत घोषणा करु दिली नाही, यांची खंत वाटत असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें