AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झारखंड विधानसभा निवडणूक : ‘त्या’ जागेवर राष्ट्रवादीची आघाडी

झारखंडमधील हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार कमलेश कुमार सिंह आघाडीवर आहेत.

झारखंड विधानसभा निवडणूक : 'त्या' जागेवर राष्ट्रवादीची आघाडी
| Updated on: Dec 23, 2019 | 1:01 PM
Share

रांची : झारखंड विधानसभा निवडणुकांच्या कलांनुसार ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ने आघाडी घेतली आहे, त्यामुळे महाराष्ट्रापाठोपाठ भाजपच्या हातून झारखंडही निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष झारखंडमध्ये विधानसभेच्या एका जागेवर आघाडीवर (NCP in Jharkhand Vidhansabha Election) आहे.

हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने आघाडी घेतली आहे. कमलेश कुमार सिंह हे या मतदारसंघात पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी बसप, राष्ट्रीय जनता दल आणि एका अपक्ष उमेदवाराला कडवी झुंज देत मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे या जागेवर भाजपने उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी झारखंड विधानसभेत खातं उघडणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो), राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेस यांची झारखंडमध्ये आघाडी आहे. सत्ताधारी भाजपसमोर आपला गड राखण्याचं आव्हान आहे. 2014 मध्ये एजेएसयू (अखिल झारखंड विद्यार्थी संघटना) पक्षाबरोबर आघाडी करणारी भाजप यावेळी स्वबळावर निवडणुकीत उतरली होती. बाबूलाल मरांडी यांचा झारखंड विकास मोर्चा हा पक्षही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

LIVE Jharkhand Election Results 2019

विधानसभेच्या 81 जागा असलेल्या झारखंडमध्ये सत्तास्थापनेसाठी 41 हा बहुमताचा जादुई आकडा आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीत 81 मतदारसंघांतून 1215 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

भाजपने पुन्हा सत्ता संपादन केली, तर झारखंड राज्याची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच एकल पक्षाचे सरकार सत्तेवर येण्याची ऐतिहासिक घटना घडू शकेल. मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणारे रघुबर दास हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत.

यापूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री असलेले बाबूलाल मरांडी, शिबू सोरेन, हेमंत सोरेन, अर्जुन मुंडा आणि मधु कोडा हे एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. राज्यात असा कोणताही मुख्यमंत्री झाला नाही, जो सत्तेवर असताना पुन्हा एकदा निवडून आला असेल. त्यामुळे रघुवार दास यांच्याकडे विजयी होण्याचं आव्हान (NCP in Jharkhand Vidhansabha Election) आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.