मुंबई महापालिकेच्या महापाैर पदाची उमेदवार म्हणून घोषणा होताच रितू तावडे यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाल्या, माझ्याकरिता…
राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून आज मुंबई महापालिकेचा महापाैर नक्की कोण असणार याबाबत स्पष्ट झाले. भाजपाकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या आहेत. महापाैर पदाची त्यानंतर सोडत काढण्यात आली. महापालिका निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला. विशेष म्हणजे मुंबईसह महत्वाच्या महापालिकेत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता आली. मुंबई महापालिकेच्या निकालातही भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपाने जोरदार बाजी मारली. आज मुंबई महापालिकेच्या महापाैर आणि उपमहापाैर पदासाठी भाजपाकडून रितू तावडे आणि शिवसेना शिंदे गटाकडून उपमहापाैर पदाकरिता संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दोन्ही उमेदवार याकरिता अर्ज करत आहेत. घाटकोपरमध्ये रितू तावडे यांची मोठी ताकद बघायला मिळते. मुंबई महापालिकेचा महापाैर हा मराठी चेहराच असावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यामध्येच आता रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
रितू तावडे यांनी महापाैर पदाकरिता आपले नाव जाहीर झाल्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली. रितू तावडे यांनी म्हटले की, मोठा आनंद आहे. भारतीय जनता पक्ष शिस्तबद्ध पक्ष आहे. वरिष्ठ जो निर्णय देतात तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य असतो. माझ्यासाठी आजचा हा ऐतिहासिक क्षण आहे, असे रितू तावडे यांनी म्हटले. रितू तावडे सलग दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
उपमहापाैरपदी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यादरम्यान भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई महापालिकेवर भाजपाचा महापाैर असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेचा महापाैर नक्की कोण होणार? यावरून विविध चर्चा या रंगताना दिसल्या.
शेवटी महापाैर पदाची माळ ही रितू तावडे यांच्या गळ्यात पडली. अडीच अडीच वर्षांकरिता ही पदे असणार आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने युती म्हणून लढवली. मोठे यश युतीला मिळाला. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र आली आणि महापालिका निवडणुका लढल्या. मात्र, म्हणाले तसे यश मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाला मिळाले नाही.
