AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या OBC नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? रोहिणी खडसेंचा सवाल

ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत.

खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या OBC नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? रोहिणी खडसेंचा सवाल
Rohini Khadse_Devendra Fadnavis
| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 11:21 AM
Share

मुंबई : ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. त्याविरोधात भाजपने (BJP OBC agitation) आक्रमक पवित्रा घेत, राज्यभर आज चक्काजाम आंदोलन सुरु केलं. या आंदोलनावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी भाजपवर हल्लाबोल केला. (Rohini Khadse daughter of Eknath Khadse attacks on Maharashtra BJP chakka jam agitation ask question to Devendra Fadnavis over OBC reservation)

ते आंदोलन करताना मा. खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना, असा सवाल रोहिणी खडसे यांनी भाजपला विचारला आहे. रोहिणी खडसे यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे.

आजचे भाजपाचे ओबीसी आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलन हास्यास्पद आहे. फक्त राजकारण करण्यासाठी हे आंदोलन आहे. आरक्षण ओबीसी समाजाला मिळायलाच हवं यात कोणाचेही दुमत नाही, फक्त यात राजकारण करू नका, असंही रोहिणी खडसे म्हणाल्या.

फडणवीसांना सवाल 

इतकंच नाही तर रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सवाल केला आहे. “आदरणीय फडणवीस साहेब. तुम्ही ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर 1/8/2019 रोजी तसेच दि. 18/9/2019 रोजी राज्य सरकारकडून केंद्राकडे इंपिरिकल डाटा मागितला होता ना? तो मिळाला नाही. खरंतर तेव्हाच अध्यादेशाद्वारा केलेले आरक्षणातील बदल टिकणार नाही, हे तुम्हाला माहित व्हायला हवे होते” असं रोहिणी खडसेंनी ट्विट केलं आहे.

भाजपचं चक्का जाम आंदोलन

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने आज चक्काजाम आंदोलन केलं आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात 1 हजार ठिकाणी हे आंदोलन होत असल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसंच पंकजा मुंडे यांनी या आंदोलनाची माहिती दिली होती. त्यानुसार भाजप नेते रस्त्यावर उतरले आहेत.

1 हजार स्पॉटवर आंदोलन

येत्या 26 जून रोजी ओबीसींच्या आरक्षणासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. राज्यातील एक हजार स्पॉटवर हे आंदोलन होणार आहे. सरकारकडून ओबीसींची दिशाभूल होत असून त्याचा निषेध यावेळी करण्यात येणार आहे, असं सांगतानाच आरक्षण देणं हे सरकारच्या हातात असताना सरकारमधील लोक मोर्चे का काढत आहेत? असा सवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. (pankaja munde call chakka jam andolan in maharashtra)

संबंधित बातम्या 

‘भाजपने ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर विधानसभेला संधी मिळाली नसती’ रोहिणी खडसेंच्या टीकेला रक्षा खडसेंचं उत्तर

‘जवळचं’ आणि ‘लांबच’ दिसण्यासाठी ‘सेन्स’ असावा लागतो; एकनाथ खडसेंच्या मुलीचं सूचक ट्विट

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.