गरिबांना वार्षिक 72 हजार रुपये देऊ, राहुल गांधींची मोठी घोषणा

गरिबांना वार्षिक 72 हजार रुपये देऊ, राहुल गांधींची मोठी घोषणा


नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली. देशात काँग्रेसची सत्ता आल्यास 20 टक्के गरिबांना वर्षाला 72 हजार रुपये देऊ, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. राजधानी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली.

गेल्या पाच वर्षात देशातील जनतेने अनेक कष्ट झेलले. मात्र काँग्रेस सत्तेत आल्यास प्रत्येकाला न्याय मिळेल, असं राहुल गांधी म्हणाले. देशातील 20 टक्के गरिबांना महिन्याला 6 हजार म्हणजेच वर्षाला 72 हजार रुपये देऊ. न्याय योजना असं या स्कीमचं नाव असेल, असं राहुल गांधी म्हणाले.

किमान वेतन अंतर्गत 25 कोटी गरिबांना या योजनेचा लाभ मिळेल. ज्यांचं उत्पन्न 12 हजारांपेक्षा कमी असेल, त्यांचं उत्पन्न 12 हजार रुपयांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करु. जर तुमचं उत्पन्न 8000 असेल, तर सरकारकडून 4 हजार रुपये मिळतील, असं राहुल गांधींनी सांगितलं.

सध्या मासिक किमान वेतन मर्यादा 12 हजार रुपये आहे. मात्र जर एखाद्या कुटुंबाचं मासिक उत्पन्न 6 हजार रुपये असेल, तर त्यांना आणखी 6 हजार रुपये देऊन त्यांचं उत्पन्न 12 हजारापर्यंत पोहोचवायला हवं, अशी आमची इच्छा आहे, असं राहुल गांधींनी नमूद केलं.

काँग्रेसला 21 व्या शतकात देशातील गरिबी कायमची मिटवायची आहे. त्यामुळे 20 टक्के गरिबांना 6 हजार रुपये मासिक वेतन दिलं जाऊ शकतं, असं राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वात श्रीमंतांना पैसे देऊ शकतात, तर काँग्रेस गरिबांना नक्कीच पैसे देईल, असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं.

राहुल गांधींनी मोदी सरकारने केलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांच्या घोषणेवरही निशाणा साधला. मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिवसाला केवळ 3.5 रुपेय दिले, मात्र खासगी विमान कंपन्यांना कोट्यवधी बहाल केले, असा आरोप यावेळी राहुल गांधींनी केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI