RSS Flag : ‘आरएसएसचा भगवा राष्ट्रीय ध्वज बनणार!’ भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं वादग्रस्त विधान

National Flag News : याआधी के.एस ईश्वरप्पा यांनी असंच विधान केलं होतं. फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांनी केलेल्या विधानाचे राजकीय पडसादही उमटले होते.

RSS Flag : 'आरएसएसचा भगवा राष्ट्रीय ध्वज बनणार!' भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं वादग्रस्त विधान
खळबळजनक विधानImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 6:26 AM

आरएसएसच्या ध्वज (Rss Flag) आणि राष्ट्रीय ध्वज (National Flag) यावरुन एक खळबळजनक विधान करण्यात आलं आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानं केलेल्या या विधानामुळे आता नवा वाद (Political Controversy) उफाळून येण्याची शक्यता आहे. कर्नाटक सरकारमधील माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्प यांनी आरएसएसचा भगवा झेंडा राष्ट्रीय ध्वज असेल, असं विधान केलंय. सलग दुसऱ्यांदा त्यांनी हे विधान केलं असून याआधी फेब्रुवारी महिन्यात देखील त्यांनी असंच म्हटलं होतं. आपल्य विधानाची पुनरावृत्ती त्यांनी केल्यानं आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एके दिवशी आरएसएसचा भगवा झेंडा राष्ट्रीय ध्वज असेल यात शंका नाही, असं विधान ईश्वरप्पा यांनी केलंय. त्यांच्या या विधानामुळे फक्त कर्नाटकातच नव्हे, तर देशातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. राजकीय वर्तुळात के.एस ईश्वरप्पा यांच्या विधानाचे पडसाद उमटण्यासही सुरुवात झाली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी ईश्वरप्पा यांच्या विधानाचा सडकून निषेध केलाय.

नेमकं ईश्वरप्पा यांचं संपूर्ण विधान काय?

के.एस ईश्वरप्पा यांनी म्हटलंय की…

भगव्या ध्वजाकडे आदरार्थी पाहिलं जातं. हजारो वर्ष भगव्या झेंड्याचा आदर केला गेलाय. भगवा ध्वज त्यागाचं प्रतिक आहे. एका दिवस भगवा ध्वज हा राष्ट्रीय ध्वज बनेल, यात शंका नाही. त्यागाची भावना जपण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भगवा झेंडा समोर ठेवून पुजा करतं. संविदानानुसार तिरंगा हा राष्ट्रध्वज आहे आणि तिरंग्याला जो मान द्यायला हवा, तो आम्ही देतोय.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

दुसऱ्यांदा ‘तेच’ विधान

याआधी के.एस ईश्वरप्पा यांनी असंच विधान केलं होतं. फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांनी केलेल्या विधानाचे राजकीय पडसादही उमटले होते. आरएसएसचा भगवा ध्वज एके दिवशी तिरंग्याची जागा घेईल, पण ते इतक्यात शक्य होणार नाही, त्याला बराच वेळ लागू शकतो, असं विधान त्यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये केलं होतं.

पण येत्या काळात लाल किल्ल्यावरुन भगवा झेंडा फडवला जाईल, असंही के एस ईश्वरप्पा यांनी म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा केलेल्या विधानामुळे ईश्वरप्पा हे चर्चेत आले आहे. दुसऱ्यांदा केलेल्या खळबळजनक विधानामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत!

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.