AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शॅडो’वाल्यांचे मुख्यमंत्रिपद रिकामेच, ‘शॅडो’ राज्यपालही नेमायचा, ‘सामना’तून मनसेला टोला

'शॅडो कॅबिनेट'चा प्रयोग 'हा खेळ सावल्यांचा' नाट्यप्रगोग ठरु नये. 'सामना' अग्रलेखातून मनसेच्या 'शॅडो कॅबिनेट'वर टीका करण्यात आली

'शॅडो'वाल्यांचे मुख्यमंत्रिपद रिकामेच, 'शॅडो' राज्यपालही नेमायचा, 'सामना'तून मनसेला टोला
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Mar 11, 2020 | 8:20 AM
Share

मुंबई : ‘महाराष्ट्रातील किंवा देशातील विरोधी पक्षाची (Saamana Editorial On Shadow Cabinet) स्थिती पाहता ‘शॅडो कॅबिनेट’चा प्रयोग म्हणजे ‘हा खेळ सावल्यांचा’ नाट्यप्रयोग ठरु नये’. ‘सामना’ अग्रलेखातून मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’वर बोचरी टीका करण्यात आली. मनसेच्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्त 9 मार्चला नवी मुंबईत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’ची (Saamana Editorial On Shadow Cabinet) घोषणा करण्यात आली.

मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’वर आता सामनातून टीका करण्यात आली आहे. तसेच, विरोधीपक्ष भाजपवरही निशाणा साधण्यात आला आहे. “लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेताच नाही आणि राज्यात विरोधी पक्ष अद्याप बादशाही भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही”, असं म्हणत मनसे आणि भाजपवर टीका करण्यात आली.

हेही वाचा : आदित्य ठाकरेंवर अमित ठाकरेंची नजर, मनसेच्या प्रतिरुप मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी

‘शॅडो’ची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की “जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करु नका”. हे बरे झाले. पुन्हा शॅडो वाल्यांचे मुख्यमंत्रिपद रिकामेच आहे.’

‘या शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा शॅडो राज्यपाल नेमला असता, तर योग्य ठरले असते. म्हणजे खेळ सावल्यांचा अधिकच रंगतदार झाला असता. महाराष्ट्रात विनोद शिल्लक आहे. राजकारणात विनोदाला वावडे नाही हे पुन्हा दिसले’, अशा शब्दांत सामना अग्रलेखातून मनसेच्या (Saamana Editorial On Shadow Cabinet) ‘शॅडो कॅबिनेट’ची खिल्ली उडवण्यात आली.

मनसेचं ‘शॅडो कॅबिनेट’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 14 वा वर्धापन दिन सोहळा 9 मार्चला नवी मुंबईत पार (MNS Shadow Cabinet by Raj Thackeray) पडला. या कार्यक्रमात मनसे नेते अनिल शिदोरे यांनी शॅडो कॅबिनेटमधील मंत्र्यांची घोषणा केली. मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्यावरही जबाबदारी देण्यात आली. यात अमित ठाकरे यांना मराठी भाषा, पर्यटन, ग्रामविकास, वने आणि आपत्ती व्यवस्थापन या खात्यांची जबाबदारी देण्यात आली .

मनसेच्या वरच्या (MNS Shadow Cabinet by Raj Thackeray) फळीतील नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर, अभिजीत पानसे, शालिनी ठाकरे यांची वर्णी ‘शॅडो कॅबिनेट’मध्ये लागली आहे. याशिवाय, संजय शिरोडकर, शिरीष सावंत, रिटा गुप्ता यांचाही मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला.

मनसे शॅडो कॅबिनेटची संपूर्ण यादी : MNS Shadow Cabinet

गृह विधी व न्याय, जलसंपदा आणि सामान्य विभाग – बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, राजीव उबंरकर, प्रवीण कदम, योगेश खैरे, प्रसाद सरफरे, दिपक शर्मा, जलसंपदा आणि लाभक्षेत्र – अनिल शिदोरे मराठी भाषा – अमित ठाकरे, अनिल चौपडे वित्त आणि गृहनिर्माण – नितीन सरदेसाई, महसूल – अनिल अभ्यंकर, दिलीप कदम, संदीप पाचंगे, उर्जा – शिरीष सावंत, मंदार हळबे, सागर देवरे, विनय भोईटे, ग्रामविकास – जयप्रकाश बावीस्कर, अमित ठाकरे, अनिल शिदोरे, प्रकाश भोईर वने, आपत्ती व्यवस्थापन – संजय चित्रे, अमित ठाकरे, संतोष धुरी, आदित्य दामले, वागिष सारस्वत, ललित यावलकर शालेय शिक्षण, उच्चशिक्षण, वैद्यकीय शिक्षण – अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर – उच्चशिक्षण, सुधाकर तांबोळी, अमोल रोगे, अभिजीत पानसे, चेतन पेडणेकर कामगार – राजेंद्र वागस्कर, गजानन राणे, सुरेंद्र सुर्वे नगरविकास आणि पर्यटन– संदिप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुणकर, किर्ती शिंदे, हेमंत कदम, संदिप कुलकर्णी, फारूक डाळा, योगेश चिले, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण – रिटा गुप्ता, कुंदा राणे सहकार आणि पणन – दिलीप धोत्रे, कौस्तुभ लिमये, वल्लभ चितळे अन्न व नागरी पुरवठा – राजा चौगुले, विशाल पिंगळे, महेश जाधव मत्स्यविकास आणि बंदरे – परशुराम ऊपरकर, निशांत गायकवाड महिला व बालविकास – शालिनी ठाकरे सार्वजनिक बांधकाम – सीमाताई शिवलकर,संजय शिरोडकर रोजगार हमी आणि फलोत्पादन – बाळा शेडगे, आशिष पुरी सांस्कृतिक कार्य – अमेय खोपकर कृषी व दुग्धविकास – संजीव पाखरे, अजय कदम कौशल्य विकास – स्नेहल जाधव सामाजिक न्याय – संतोष सावंत, गजानन काळे ग्राहक सरंक्षण – प्रमोद पाटील आदिवासी विकास – आनंद एमबडवाड, किशोर जाचक, परेश चौधरी पर्यावरण – रुपाली पाटील, किर्तीकुमार शिंदे, देवव्रत पाचिल खारजमीन भुकंप पुनर्वसन – अमिता माझगावकर क्रीडा व युवककल्याण – विठ्ठल लोकणकर अल्पसंख्यांक – अल्ताफ खान, जावेद तडवी

(Saamana Editorial On Shadow Cabinet)

संबंधित बातम्या :

मला थेट संपर्क करा, शॅडो कॅबिनेटमध्ये वर्णी लावतो, राज ठाकरेंची खुली ऑफर

Raj Thackeray | लोकांना आमच्याकडून अपेक्षा, मात्र मतदान आम्हाला नाही : राज ठाकरे

छातीत राम आहे, मग बडवता कशाला? ‘सामना’तून चंद्रकांत पाटलांवर टीका

आशिष शेलार एक तास ‘कृष्णकुंज’वर, 20 दिवसांत चौथ्यांदा राज ठाकरेंच्या भेटीला

Follow Us
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?