मुख्यमंत्र्यांना फक्त 40 आमदारांच्या खोक्यांची काळजी; सामनातून योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर भाष्य अन् शिंदेंवर निशाणा

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर भाष्य करण्यात आलंय. वाचा...

मुख्यमंत्र्यांना फक्त 40 आमदारांच्या खोक्यांची काळजी; सामनातून योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर भाष्य अन् शिंदेंवर निशाणा
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 7:55 AM

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या मुंबई दौऱ्यावर भाष्य करण्यात आलं आहे. या दौऱ्यावर भाष्य करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधण्यात आला आहे. “योगी गुंतवणूकदारांना लखनौला येण्यासाठी निमंत्रित करीत होते, तेव्हा आपले मुख्यमंत्री नाशकातील पालापाचोळा-कचरा गोळा करून ठाकऱ्यांची शिवसेना फोडण्याचा आव आणीत होते व त्या पालापाचोळय़ासमोर दंड ठोकून भाषण करीत होते. उत्तर प्रदेश-बिहारचे राज्यकर्ते मुंबईत येऊन येथील गुंतवणुकीची लूट करीत आहेत व मुख्यमंत्री शिवसेना पह्डण्याच्या कामात रमले आहेत. माणसाला त्याच्या लायकीपेक्षा वरचे पद मिळाले की हे असे घडायचेच”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

अयोध्येत महाराष्ट्र भवनाची जागा देण्याचे मान्य करून योगी महाराजांनी मुंबईतून 5 लाख कोटी नेले. म्हणजे महाराष्ट्राच्या हाती आवळा देऊन कोहळा काढण्याचाच हा प्रकार.पण सत्तेवर दुर्बळ, लाचार, बधिर सरकार असल्यावर दुसरे काय व्हायचे? मुख्यमंत्र्यांना फक्त चाळीस आमदारांच्या खोक्यांची काळजी. पुन्हा जमले तर शिवसेनेच्या महावृक्षाखालचा पाचोळाही गोळा करायचा आहे. तीन महिन्यांपूर्वी केलेल्या ‘क्रांती’वर थुकरट भाषणे करायची आहेत. महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष द्यायला वेळ आहेच कुठे?, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी त्यांचे व्यावसायिक परममित्र अजय आशर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी ‘मैत्री’ नामक संस्था उभी केली. त्या ‘मैत्री’ने ही गुंतवणूक बाहेर कशी जाऊ दिली? की या पाच लाख कोटींमागे टक्केवारीचे ‘समृद्धी’ हिशेब झाले. सरकारचे जे बिऱहाड दावोसला बर्फ उडवायला निघाले आहे त्या बिऱहाडात या अजय आशरचाही समावेश आहे हे विशेष.

मुंबईतील गुंतवणूक दुसरेच लोक पळवत आहेत व आपले सरकार परदेशी गुंतवणुकीसाठी दावोसला निघाले म्हणजे-‘मधु मागशी माझ्या सख्या परी मधु घट हे रिकामे पडती घरी… याच काव्यपंक्तीप्रमाणे चालले आहे’, असं म्हणत सामनातून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.