सारथीच्या बैठकीत मराठा समाज समन्वयकांचा गोंधळ, संभाजीराजेंना मंचाखाली बसवल्याने वाद

संभाजी राजे यांनी आपण सामान्य जनतेचा प्रतिनिधी असल्याचे सांगत तिसऱ्या रांगेत बसण्याची तयारी दर्शवली

सारथीच्या बैठकीत मराठा समाज समन्वयकांचा गोंधळ, संभाजीराजेंना मंचाखाली बसवल्याने वाद
Follow us
| Updated on: Jul 09, 2020 | 12:59 PM

मुंबई : मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या बैठकीत गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीराजे यांना व्यासपीठाखाली बसवल्यामुळे मराठा समाज समन्वयकांनी गोंधळ घातला. (Saarathi Meeting Maratha Protesters Ruckus as Chhatrapati Sambhajiraje sits in third row)

जाणून बुजून छत्रपतींचा अपमान केल्याचा आरोप मराठा समाज समन्वयकांनी केला. संभाजीराजे यांनी मात्र “मी समाजासाठी आलोय. मला खाली बसण्यात कसलाही अपमान वाटत नाही” अशी सामंजस्याची भूमिका घेतली. त्यानंतर अजित पवारांनी चूक सुधारत राजेंना वरती येण्याचा आग्रह केला.

संभाजी राजे यांनी आपण सामान्य जनतेचा प्रतिनिधी असल्याचे सांगत तिसऱ्या रांगेत बसण्याची तयारी दर्शवली. “गोंधळ घालू नका. आपल्याला समाज महत्वाचा आहे. समाजासाठी आपण मान अपमान न मानता बैठक करू. निर्णय महत्वाचा आहे. सारथी महत्वाची आहे.” असे आवाहन त्यांनी मराठा समाज समन्वयकांना केले.

मराठा समाज समन्वयक काय म्हणाले?

जाणून बुजून छत्रपतींचा अपमान केल्याचा आरोप मराठा समाज समन्वयकांनी केला. “मी बाहेर जाऊ का?” असे संभाजीराजेंनी विचारताच “असं नाही, तुमची इच्छा, त्यापेक्षा आम्ही जातो न बाहेर, उद्या आम्हाला पण विचारतील ना. छत्रपतींबरोबर गेला होतात, खाली बसवायला गेला होतात का? बाहेर काय तोंड द्यायचं आम्ही? बाहेर आम्हाला लोक काय बोलणार? बाहेर एक माणूस तोंड काढू देणार नाही छत्रपती बाहेर बसले तर” असे मराठा समाज समन्वयक म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

या बैठकीला उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आधी बैठकीबाहेर गेले. त्यानंतर “मला अजित पवार यांनी विनंती केली, कीआत बोलू” अशी प्रतिक्रिया देत छत्रपती संभाजीराजेही बैठकीतून बाहेर पडले. दोघांमध्ये पुन्हा दुसऱ्या दालनात स्वतंत्र चर्चा झाली.

दरम्यान, “या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची? सारथीमध्ये पगार नाही, मानधन नाही असे किमान पाचशे जण आहेत. त्यांना आधी रोजगार द्या मग, महाजॉब्ससारखी पोर्टल सुरु करा” अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.

संबंधित बातम्या :

अजित पवारांचा छत्रपती संभाजीराजेंना फोन, ‘सारथी’ प्रश्नी बैठकीला येण्याची विनंती

(Saarathi Meeting Maratha Protesters Ruckus as Chhatrapati Sambhajiraje sits in third row)

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.