AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा हीन डाव उघड : सचिन सावंत

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज तात्काळ स्वीकारण्यावरुन भाजपवर सडकून टीका केली आहे (Sachin Sawant criticize BJP after VRS of Bihar DGP Gupteshwar Pandey).

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा हीन डाव उघड : सचिन सावंत
| Updated on: Sep 23, 2020 | 4:54 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज तात्काळ स्वीकारण्यावरुन भाजपवर सडकून टीका केली आहे (Sachin Sawant criticize BJP after VRS of Bihar DGP Gupteshwar Pandey). “स्वेच्छा निवृत्तीसाठी किमान 3 महिन्यांची नोटीस देणे गरजेचं असताना गुप्तेश्वर पांडे यांचा अर्ज तात्काळ स्वीकारण्यात आला. आता पांडे यांना लवकरच भाजपकडून मोठे बक्षीस मिळू शकेल यात शंका नाही. यातून भाजपचा महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हीन डाव उघड झाला,” असा आरोप सचिन सावंत यांनी केला.

सचिन सावंत म्हणाले, “अभिनेता सुशांत सिंह प्रकरणाचा वापर करुन महाराष्ट्राला बदनाम करत मुंबईचं राष्ट्रीय महत्व कमी करण्याचा भाजपाचा डाव उघड झाला आहे. या कटाचा एक भाग असलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला आहे. तो तात्काळ मंजूरही करण्यात आला आहे. या पांडेंना लवकरच भाजपकडून मोठे बक्षीस मिळू शकेल यात शंका नाही. सुशांतनंतर आता बॉलिवूडला टार्गेट करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.”

“बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांतसिंग प्रकरणात मुंबई पोलिसांची यथेच्च बदनामी केली. आता त्यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला आणि तो तात्काळ मंजूरही करण्यात आला. वास्तविक पाहता यासाठी तीन महिन्यांची नोटीस द्यावी लागते, परंतु पांडेंनी अर्ज दाखल करताच सरकारने मेहरबानी दाखवत तो मंजूर केला. आता भाजपकडून पांडेंना आणखी मोठे बक्षीस दिले जाण्याची शक्यता आहे,” असंही सचिन सावंत यांनी सांगितलं.

भाजपाला सुशांतसिंगबदद्ल काही आत्मियता नाही मात्र त्याच्या मृत्यूचा वापर बिहार निवडणुकीसाठी आणि महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी करता येऊ शकतो हे पाहून त्यांनी या संधीचा वापर करुन घेतला. देश पातळीवर मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी व लोकांचे लक्ष मुख्य समस्यांपासून दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाने या मुद्द्यांचा वापर केला. आता बॉलिवूडला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसापूर्वीच उत्तर प्रदेशात भव्य चित्रपटसृष्टी उभी करण्याची घोषणा केली हा काही निव्वळ योगायोग नाही, असे सावंत म्हणाले.

काँग्रेसचे एनसीबीला तीन प्रश्न

सचिन सावंत म्हणाले, “सध्या एनसीबीच्या महासंचालक पदावर मोदी यांचे अत्यंत प्रिय व्यक्ती असलेले राकेश अस्थाना आहेत. मुंबईत एनसीबीचे अनेक वर्षांपासून कार्यालय आहे आणि बॉलिवूडही मुंबईतच आहे. असं असताना आतापर्यंत त्यांनी बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन संदर्भात चौकशी का केली नाही. त्यांनी अशी चौकशी करु नये असा आमचा आक्षेप नक्कीच नाही.”

“सरकारनं बॉलिवूडचा ड्रग्जशी संबंध असल्याचे कोणतेही भक्कम पुरावे एनसीबीकडे नसल्याचं संसदेत सांगितलं”

“सुशांत प्रकरणातील ड्रग अँगलच्या तपासासाठी ईडीने एनसीबीला पाचारण केले होते. एनसीबीने 15/2020 च्या पहिल्या एफआयआरनुसार आतापर्यंत एकही अटक केलेली नाही. ज्या अटक करण्यात आल्या आहेत त्या 16/2020 च्या दुसऱ्या एफआयआरनुसार केलेल्या आहेत. मग एनसीबीने सुशांतसिंग प्रकरणाचा तपास सोडून दिला आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावे. बॉलिवूडला ड्रगशी जोडण्यासंदर्भात कोणतेही भक्कम पुरावे एनसीबीकडे नाहीत हे सरकारने संसदेत सांगितले आहे त्यावर एनसीबीचे मत काय?” असे तीन प्रश्न सचिन सावंत यांनी एनसीबीला विचारले आहेत.

संबंधित व्हिडीओ :

Sachin Sawant criticize BJP after VRS of Bihar DGP Gupteshwar Pandey

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.