बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराचा शिवसेनेत प्रवेश

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड गुरमीत सिंग उर्फ शेराने (Salman Khan Bodygaurd Shera join Shivsena) शुक्रवारी (18 ऑक्टोबर) शिवसेनेत प्रवेश केला.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड गुरमीत सिंग उर्फ शेराने (Salman Khan Bodygaurd Shera join Shivsena) शुक्रवारी (18 ऑक्टोबर) रात्री उशिरा शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित त्याने शिवसेना पक्षप्रवेश केला. ऐनविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याच्या राजकीय प्रवेशाने (Salman Khan Bodygaurd Shera join Shivsena) राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.


गुरमीत सिंग उर्फ शेरा हा सलमान खानचा अत्यंत निकटचा आणि विश्वासू सहकारी मानला जातो. त्यामुळे सलमान खानच्या परवानगीनेच हा पक्षप्रवेश झाल्याची चर्चा रंगली आहे. शेराच्या निमित्ताने सलमान खाननेच शिवसेनेला पाठिंबा दिल्याचंही बोललं जात आहे. सलमान खानचे कुटुंबीय आणि ठाकरे कुटंबीय यांचे स्नेहपूर्ण संबंध असल्याचं मागील काळात पाहायला मिळालं आहे. त्यामुळे शेराच्या राजकीय प्रवेशाबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.

शेराच्या राजकीय प्रवेशामागे त्यांच्या लोकप्रियतेचा उपयोग करुन घेण्याचा हेतू असल्याचं बोललं जात आहे. आता शेराच्या या राजकीय एन्ट्रीचा शिवसेनाला या विधानसभा निवडणुकीत किती फायदा होणार हे पाहावे लागणार आहे.

या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती थेट निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे शिवसेनेने आपली ताकद पणाला लावली आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंना शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून सादर केले जात आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेने पक्षाच्या संघटनेवर अधिक लक्ष दिल्याचं दिसत आहे. याचाच भाग म्हणून मागील काळात सचिन अहिर यांच्यापासून अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *