Sambhaji Bhide : संभाजी भिडे चक्कर येऊन सायकलवरुन पडले, गंभीर दुखापतीमुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे चक्कर आल्यानं सायकलवरुन पडल्याची माहिती मिळतेय. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कमरेखाली खुब्याला मार लागला आहे. भारती रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Sambhaji Bhide : संभाजी भिडे चक्कर येऊन सायकलवरुन पडले, गंभीर दुखापतीमुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल
संभाजी भिडेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 10:42 PM

सांगली : आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असलेले आणि राजकीय घडामोडींवर सडेतोड मतप्रदर्शन करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) चक्कर आल्यानं सायकलवरुन पडल्याची माहिती मिळतेय. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कमरेखाली खुब्याला मार लागला आहे. भारती रुग्णालयात (Bharti Hospital) त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. संभाजी भिडे नित्यनियमाने सांगलीतील (Sangli) गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असतात. आजही ते दर्शनासाठी सायकलवरुन जात होते. त्यावेळी गणपती पेठ परिसरात त्यांना चक्कर आल्यानं ते जमिनीवर कोसळले. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळतेय.

हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत- भिडे

दरम्यान, संभाजी भिडे यांनी कालच एक वक्तव्य केलं होतं. व्यक्तीच्या जीवनात भूतबाधा होते. समाजात खाण्या पिण्यातून अनेकांना विषबाधा होते. या भूतबाधेवर, विषबाधेवर उपाय आहे. पण हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्लेंच बाधा, दुसरी आंग्ल बाधा आणि तिसरी गांधी बाधा, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. मिरजमध्ये शिवतीर्थ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या अनावरण कार्यक्रमात संभाजी भिडे बोलत होते. ते म्हणाले की, म्लेंच बाधा, आंग्ल बाधा आणि तिसरी गांधी बाधा. या तिनही बाधांवर तोडगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची उपासना आपण केली पाहिजे.

म्लेंच बाधा म्हणजे पाकिस्तान, बांग्लादेशच्या मुस्लिम समाजाच्या विचारांची बाधा, आंग्ल बाधा म्हणजे इंग्रज आपल्यावर स्वार झाले आणि त्यामुळे झालेली इंग्रजी विचारांची बाधा, तर शस्त्राविना स्वातंत्र्य मिळते हा विचार म्हणे गांधी विचारांची बाधा. अशा तीन बाधा हिंदुस्थानला झाल्याचं संभाजी भिडे म्हणाले.

‘123 कोटी जनतेचा रक्तगट शिवाजी, संभाजी केला पाहिजे’

त्याचबरोबर हिंदुस्थान चोरांच्या ताब्यात आहे. त्यांना नेस्तनाबूत करा. देशावर भगव्याचे राज्य स्थापित करा. छत्रपतींची ती अपेक्षा आहे. ते पूर्ण करण्याचं काम आपल्याला करावं लागेल. देशाला ताकद देण्यासाठी हिंदुस्थानच्या सर्व समाजातील 123 कोटी जनतेचा रक्तगट बदलला पाहिजे. त्यांचा रक्तगट शिवाजी-संभाजी केला पाहिजे, असंही वक्तव्य त्यांनी मंगळवारी केलं.

इतर बातम्या :

Raj Thackeray : मनसे नेते औरंगाबादेत, राज ठाकरेंच्या सभेला अद्याप परवानगी नाही, निर्णय उद्या

Petrol Diesel Price Hike : इंधन दरवाढीवरुन केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष तीव्र; आता फडणवीसांनी राज्य सरकारला दिलं थेट आव्हान

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.