Sambhajiraje Chatrapati : संभाजीराजे छत्रपती मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल! राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

संभाजीराजे छत्रपती मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात नेमकी काय चर्चा होते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष लढणार असल्याची घोषणा केलीय.

Sambhajiraje Chatrapati : संभाजीराजे छत्रपती मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी दाखल! राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग
संभाजीराजे छत्रपती, उद्धव ठाकरेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 6:01 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर राजधानी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात नेमकी काय चर्चा होते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष (Independent) लढणार असल्याची घोषणा केलीय. त्या पार्श्वभूमीवर ते सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेत आहेत. मात्र, शिवसेनेनं राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे.

शिवसेना दुसरा उमेदवार देणार

संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना करत आपण राज्यसभेसाठी अपक्ष उभे राहणार असल्याचं जाहीर केलं. तसंच सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन पाठवावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मात्र, संभाजीराजे यांची राज्यसभेसाठीची वाट खडतर असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण शिवसेना सहाव्या जागेवर उमेदवार देणार असल्याचं अनिल परब आणि संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे संभाजीराजेंचं दुसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग खडतर बनला आहे.

शिवसेनेची संभाजीराजेंना ऑफर

राज्यसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केलं आहे. त्यानंतर त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना पाठिंबा देण्याचं आवाहनही केलं. त्यांच्या आवाहनानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची शिल्लक राहिलेली मतं संभाजीराजेंना देण्यात येतील, असं जाहीर केलं. तर शिवसेनेकडून मात्र सहाव्या जागेसाठी उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अशावेळी शिवसेनेनं संभाजीराजेंना राज्यसभेसाठी एक ऑफर दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शनिवारी संभाजीराजे आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. त्या बैठकीत संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, त्यानंतर पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी अट घातल्याची माहिती मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यसभेच्या संख्याबळाचं गणित कसं?

राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 42 मतांची गरज आहे. भाजपकडे सध्या 113 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यात भाजपचे 106, रासप 1, जनसुराज्य 1 आणि 5 अपक्षांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदार आहेत. या संख्याबळानुसार भाजपचे दोन तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल. तर सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती अपक्ष लढणार आहेत.

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.