AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli District Central Cooperative Bank Election : टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम केला, गोपीचंद पडळकर यांची खोचक टीका; निकाल लागताच कुणाला डिवचलं?

गोपीचंद पडळकरांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. निकालानंतर त्यांनी जयंत पाटलांवर 'करेक्ट कार्यक्रम' म्हणत खोचक टीका केली. जतच्या मतदारांनी मला निवडून दिलं, हा गोरगरिबांचा विजय आहे असं पडळकर म्हणाले. जिल्हा बँकेचा राजकारणाचा अड्डा होऊ देणार नाही आणि कर्मचाऱ्यांसाठी काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Sangli District Central Cooperative Bank Election : टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम केला, गोपीचंद पडळकर यांची खोचक टीका; निकाल लागताच कुणाला डिवचलं?
Gopichand PadalkarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 03, 2026 | 11:50 AM
Share

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागताच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे. जतच्या जनतेने टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम केला, अशी खोचक टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर यांचा एकतर्फी विजय झाला आहे. या निवडणुकीत पडळकर 54 मतांनी विजयी झाले आहेत. त्यानंतर त्यांनी ही खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वपक्षीय निवडणूक होताना गोपीचंद पडळकर यांच्यासह सहा जागांवर निवडणूक झाली होती. त्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या जत सोसायटी गटातील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलं होतं. अखेर पडळकर यांनी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या विनोद पवार यांचा दारुण पराभव करत जिल्हा बँकेत एन्ट्री केली आहे. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा गावगाड्यातील गोरगरीबांचा विजय आहे. आपल्या गावातील मुलगा बँकेत गेला पाहिजे, असं लोकांना वाटत होतं. त्यामुळे मतदारांनी मला मतदान केलं. मदत केली. त्यामुळे या विजयाचं श्रेय या सर्वांना जातं, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

सहावेळा कोर्टात गेले, आता परत…

सहावेळा या निवडणुकीत ते कोर्टात गेले. कोर्टाने त्यांना दाद लागू दिली नाही. सहावेळा कोर्टात जायला असं काय आहे? आता म्हणतात ते निकालानंतर कोर्टात जाणार आहे. कोर्टात जायला असं काय आहे. तुमच्या स्वत:च्या बँका आहेत. ठेवी ठेवताना तुमच्या बँकेत ठेवायच्या आणि कर्ज मात्र जिल्हा बँकेतून घ्यायचं हे चालणार नाही. आम्ही सर्व प्रकरणं तपासणार आहोत. कारखान्याला पैसे देण्याबाबत दुमत नाही. पण बुडवायचे कशाला? असा सवाल पडळकर म्हणाले.

राजकारणाचा अड्डा झाला

जिल्ह्याचं राजकारण या बँकेतून केलं जात होतं. ही नुसता सहकारी बँक नव्हती. तर जिल्ह्याच्या राजकारणाचा अड्डा झाला होता. कारखाने किती विकले? मी आलो तर सहकाराला अडचण येईल सांगत होते. तुम्ही काय काम केलं? असा सवाल त्यांनी केला. जिल्हा बँकेंच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढला पाहिजे, तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी योजना आणल्या पाहिजे, असं सांगतानाच सदाभाऊ खोत आणि आम्ही जिल्हा बँकेचं धोरण ठरवणार आहोत. एक दोन लोकांचा फायदा होऊ देणार नाही. मनमानी होऊ देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी....
Tusshar Kapoor : तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी मागितल्याचा दावा
गोकुळमध्ये मित्रपक्षांना डावलल्याचा आरोप; शासन नियुक्त सदस्य निवडीवरून
Mahayuti : गोकुळमध्ये मित्रपक्षांना डावलल्याचा आरोप; शासन नियुक्त सदस्य निवडीवरून महायुतीत नाराजीचा सूर
पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची नाराजी
NCP : निर्णय घेताना वरिष्ठांना विश्वासात घ्या...; पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी
सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय
Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय; कार्यकर्त्यांचा जल्लोष
अवघ्या एका मताने फिरला निकाल; संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटील....
District Bank Election Result 2026 : अवघ्या एका मताने फिरला निकाल; संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटील पराभूत
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी....
Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी, कोण मारणार बाजी?
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभूराज देसाईंची बाजी, पाटणकरांना....
Satara District Bank Election Result : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभूराज देसाईंची बाजी, पाटणकरांना धक्का; कार्यकर्त्यांचा जल्लोष
हायकोर्टात राम पूर्णेकरांचे वकील महत्त्वाचे पुरावे सादर करणार....
Pradeep Purnekar : Ram Purnekar : हायकोर्टात राम पूर्णेकरांचे वकील महत्त्वाचे पुरावे सादर करणार; कोणते महत्त्वाचे मुद्दे समोर येणार?
सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांसाठी आज निकाल; कोण मारणार बाजी?
Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांसाठी आज निकाल; कोण मारणार बाजी?
चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार...
Manoj Jarange Patil : चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार... मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा