AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : आघाडीची मते बाद करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निवडणूक आयोगाला सूचना; राऊतांचा गंभीर आरोप

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : निवडणुकीच्या दिवशी महाराष्ट्रात आयोगाला हाताशी धरून इथले भाजपचे नेते काय करत होते सर्व माहीत आहे. केंद्रीय गृहखात्याकडून निवडणूक आयोगाला कसे फोन जात होते कुणाचं मत बाद करायचं यावर कशी चर्चा सुरू होती हे सर्व माहीत आहे.

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : आघाडीची मते बाद करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निवडणूक आयोगाला सूचना; राऊतांचा गंभीर आरोप
आघाडीची मते बाद करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निवडणूक आयोगाला सूचना; राऊतांचा गंभीर आरोपImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 12, 2022 | 10:47 AM
Share

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेना नेते संजय पवार (sanjay pawar) यांचा पराभव झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. निवडणुकीच्या दिवशी मतदानावर भाजपकडून आक्षेप घेतला गेला. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्रालय निवडणूक आयोगाच्या संपर्कात होते. कोणती मतं बाद करायची आणि कोणती नाही, याच्या सूचना निवडणूक आयोगाला वारंवार दिल्या जात होत्या. असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच त्यांच्या हातात ईडी होती. आमच्या हातात ईडी नव्हती. फक्त 48 तासांसाठी आमच्या हातात ईडी द्या भाजपच काय देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना भाजपवर आरोपाच्या फैरी झाडत थेट अमित शहा यांच्या हातात असलेल्या गृहखात्यावरच गंभीर आरोप केले आहेत.

निवडणुकीच्या दिवशी महाराष्ट्रात आयोगाला हाताशी धरून इथले भाजपचे नेते काय करत होते सर्व माहीत आहे. केंद्रीय गृहखात्याकडून निवडणूक आयोगाला कसे फोन जात होते कुणाचं मत बाद करायचं यावर कशी चर्चा सुरू होती हे सर्व माहीत आहे. यंत्रणा आमच्याकडेही आहेत. फक्त ईडी नाही. फक्त ईडी आमच्याकडे 48 तासासाठी दिली तर भाजपही आम्हाला मतदान करेल, असं संजय राऊत म्हणाले.

आमदारांचा अवमान करायचा नाही

अपक्ष आमदारांनी कुणाला पाठिंबा दिला हे आम्हाला सगळं माहीत आहे. म्हणून बोललो. विषय संपला आहे. अपक्ष आमदार काही करणार नाहीत. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. कोणत्याही आमदारांचा अवमान करण्याचा प्रश्नच नाही. आम्ही काय बोलतो हे त्यांनाही माहीत आहे आणि भाजपलाही माहीत आहे. आमच्या हातात दोन दिवस ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, असं ते म्हणाले. एक विजय झाला, एक पराभव झाला म्हणजे अणूबॉम्ब कोसळला असं होत नाही. महाप्रलय आला असं होत नाही. अनेक राज्यात असा निकाल लागला आहे. राजस्थानात काँग्रेस जिंकली. हरियाणात रडीचा डाव करून अजय माकन यांचा पराभव केला, असा हल्लाही त्यांनी चढवला.

तर पाकिस्तानवर बॉम्ब टाका

देशात हिंसा होत आहे. हा हल्ला पाकिस्तान प्रायोजित आहे असं भाजपला वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानावर जाऊन बॉम्ब टाकावा. चीन भारताच्या हद्दीत घुसला आहे. लडाखमध्ये चीनने सर्व आणून ठेवलं आहे. टँक आणून ठेवले. दारूगोळा आणून ठेवला आहे. चीनवर डोळे वटारून पाहा. मग पाहू, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. काश्मीर पंडितांचं पलायन सुरू आहे ते थांबवा. नामांतर करून चालत नाही. काश्मिरातील रक्तपात थांबवा आम्ही स्वागत करू, असंही ते म्हणाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.