
मुंबई – मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) राजकारण एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण महाराष्ट्रात राजकीय घडामोडी अत्यंत जलदगतीने घडत आहेत. याला कारणीभूत भाजप (BJP) असल्याचा आरोप महाविकास आघाडी (MVA) करीत आहे. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यापासून आरोप-प्रत्योरोप सुरू आहे. शिवसेनेतून बंड केल्यानंतर राजकीय नाट्य दहा दिवस चाललं. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. म्हणून त्यांनी शिवसेना फोडली असं विधान केलं आहे. त्यानंतर शिवसेनेला मुंबईत दुबळं करायचं आहे म्हणून भाजपाने शिवसेना फोडली असं देखील वक्तव्य केलं आहे. आज माध्यमाशी बोलताना संजय राऊत आक्रमक शैलीत पाहायला मिळाले. महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय गोष्टीवर त्यांनी आज भाष्य केलं.
भाजपने केलेली ही तात्पुरती तजवीज आहे, असा संजय राऊत यांनी बंडखोर नेत्यांना टोला लगावला. देशाचं राजकारण रक्तरंजित होतं चाललं आहे अशी टीका केली. “शरद पवार जे म्हणत आहेत, त्यानुसार मध्यावधी निवडणुकांचा महाराष्ट्राला सामोरं जावं लागेल, गुजरातसोबत महाराष्ट्रातही निवडणुका होऊ शकतात, अशी माझी माहिती आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलं.
2019 मध्ये शिवसेनेला डावललं, 2022 मध्ये फोडलं, याचा अर्थ तुम्हाला शिवसेनेलं दुबळं करणं, तोडणं, हेच कारण आहे, असं संजय राऊत आज पहिल्यांदा म्हणाले. जिथे ठाकरे तिथे शिवसेना, हे समीकरण आहे. चार खासदारांनी भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे शिंदेची तडजोड करणार का, यावर बोलताना राऊतांचं मोठं विधान केलं आहे. शिवसेना पक्ष पुन्हा पुन्हा फोडण्याचा प्रयत्न होतो. पण शिवसेना पुन्हा उभी राहते. जोपर्यंत मुंबईत शिवसेना ताकदीनं उभी आहे. तोपर्यंत दिल्लीचे इरादे पूर्ण होणार नाही. महाराष्ट्राचे दिल्लीला तीन तुकडे करायचे आहेत. त्यातील एक तुकडा मुंबईचा आहे. मुंबईच्या धनसत्तेवर काही लोकांना ताबा हवा आहे. त्यासाठी काहींना शिवसेनेला कमजोर करायचं आहे. या सगळ्यांचं सूत्र या फोडाफोडीमागे आहे.
आजही शिवसैनिकी रस्त्यावर येतील आणि लढा देतील.