AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malegaon : चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा गेली गटारात, पलटी न झाल्याने मोठा अनर्थ टळला

सध्या पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे अनेकजण गाड्या चालवण टाळतात. तर अनेकजण पावसाची मज्जा घेण्यासाठी गाड्या चालवतात. तसेच अनेकांना रस्त्यांची दुर्दशा असल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

Malegaon : चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा गेली गटारात, पलटी न झाल्याने मोठा अनर्थ टळला
बसने जोराची धडक दिल्याने रिक्षा गटारातImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 04, 2022 | 9:23 AM
Share

मालेगाव – मालेगाव (Malegaon) शहरातील जुन्या आग्रा महामार्गावर (Agra Highway) संध्याकाळच्या सुमारास बस (Bus) व रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालकासह एक जण जखमी झाला आहे. या रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. त्यातच रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले, मात्र तेही अपूर्ण आहे. त्यामुळे सातत्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. त्यातूनच हा अपघात झाल्याचे बोलल जात आहे. अपघातानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात रिक्षा गेली. सुदैवाने ती पलटी न झाल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान अपघातानंतर जखमींना तातडीने सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

रिक्षा चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा थेट नाल्यात गेली

सध्या पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे अनेकजण गाड्या चालवण टाळतात. तर अनेकजण पावसाची मज्जा घेण्यासाठी गाड्या चालवतात. तसेच अनेकांना रस्त्यांची दुर्दशा असल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मालेगावात काल अपघात झाला, त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या बसचा आणि रिक्षा अपघात झाला. त्यावेळी रिक्षा चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा थेट नाल्यात गेली. झालेल्या घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत. दोघांनाही तिथल्या सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. नेमका कशामुळे अपघात झाला याची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.

रस्त्याचं काम तातडीने पुर्ण करावे

जिथं अपघात झाला आहे, तिथं मागच्या अडिच वर्षांपासून रस्त्याचे काम चालू आहे. काम अर्धवट असल्याने अपघात झाला असल्याचे माहिती मिळाली आहे. तिथं आत्तापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे रस्त्याचं काम तातडीने पुर्ण करावे अशी मागणी तिथल्या गावकऱ्यांची आहे. काल झालेल्या अपघातामध्ये नाल्यात गेलेली रिक्षा पलटी झाली नाही मोठा अनर्थ ठळला आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.