सुशांतला मी बिहारचा मानत नाही, तो मुंबईचाच, त्याला बिहारमध्ये कोण ओळखत होतं? : संजय राऊत

सुशांतला मी बिहारचा मानत नाही. तो मुंबईचा होता. बिहारमध्ये असताना त्याला कोण ओळखत होतं?, तो मुंबईत आला आणि त्याच्या कामाने त्याला ओळख मिळाली. मुंबई ही त्याची कर्मभूमी आहे, असं राऊत म्हणाले.

सुशांतला मी बिहारचा मानत नाही, तो मुंबईचाच, त्याला बिहारमध्ये कोण ओळखत होतं? : संजय राऊत
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 11:34 AM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतला मी बिहारचा मानत नाही. तो मुंबईचाच होता. बिहारमध्ये त्याला कोण ओळखत होतं?, असं वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ‘शट अप या कुणाल’ या खास मुलाखतीत राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. (Sanjay Raut On Sushant Sinh Rajput)

“सुशांतला मी बिहारचा मानत नाही. तो मुंबईचा होता. बिहारमध्ये असताना त्याला कोण ओळखत होतं?, तो मुंबईत आला आणि त्याच्या कामाने त्याला ओळख मिळाली. मुंबई ही त्याची कर्मभूमी होती”, असं राऊत म्हणाले.

“सुशांतला न्याय मिळाला पाहिजे, हे ओरडणाऱ्यांपेक्षा आम्हाला जास्त वाटतं. ओरडून खोट्याचं खरं करता येत नसतं. सुशांतसोबत खरंच काही चुकीचं घडलं असेल तर आम्ही त्याला न्याय देऊ”, असंही राऊत म्हणाले.

“कुणी कितीही ओरडलं तरी खोटं ते खोटं खोटं… न्याय देण्याच्या गोष्टी करणाऱ्यांनी हळू बोलावं पण खरं बोलावं, असा टोला राऊत यांनी रिपब्लिकचे संपादक अर्णव गोस्वामी यांना लगावला. तसंच विवेकानंदांचा शांततेचा विचार जगभर गेला, त्यामुळे शांत आणि खरं बोलण्याची भूमिका ठेवा, असा सल्लाही राऊत यांनी दिला.

“सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी तपास केला तोच तपास खरा आहे यावर शिक्कामोर्तब झालंय. मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे. देशाची सगळ्यात जास्त विश्वासार्ह मुंबई पोलिस फोर्स आहे. वर्दीवर विश्वास ठेवला पाहिजे, असंही राऊत यांनी नमूद केलं.

“अमुक व्यक्ती सरकारच्या विरोधात बोललं की कारवाई करा, असं मुंबई पोलिसांना सांगितलेलं नाही. कारण तो पोलिसांचा अधिकार आहे की कुणावर कारवाई करायची, कोणत्या वेळी अ‌ॅक्शन घ्यायची. मुख्यमंत्र्यावर, शरद पवारांवर, संजय राऊतांवर कुणी टीका केली म्हणजे त्यावर कारवाई करा, असं सरकारने पोलिसांना सांगितलेलं नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे”, असंही सांगायला राऊत विसरले नाहीत. (Sanjay Raut On Sushant Sinh Rajput)

संबंधित बातम्या

‘बाळासाहेबांनी मला 28 व्या वर्षी संपादक बनवलं, म्हणून….’ कुणाल कामराच्या ‘त्या’ प्रश्नावर संजय राऊतांचं भावनिक उत्तर

भाजपसोबत आमचा भावनिक बंध होता, 25 वर्षांचं नातं तोडताना खूप दु:ख झालं: संजय राऊत

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.