गोपीनाथरावांची कन्या पराभूत होणार असेल तर…. : संजय राऊत

सातऱ्याचा पराभव हा सेना-भाजपचा पराभव नाही तर तो उदयनराजे यांचा व्यक्तिगत पराभव आहे, असं संजय राऊत (Sanjay Raut reaction on Pankaja Munde) म्हणाले.

गोपीनाथरावांची कन्या पराभूत होणार असेल तर.... : संजय राऊत


Maharashtra Assembly election results 2019 मुंबई :  उदयनराजेंप्रमाणे मला परळीतला निकाल अपेक्षित वाटत होता. गोपीनाथरावांची कन्या पराभूत होणार असेल तर तिथं लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करावा लागेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut reaction on Pankaja Munde) यांनी टीव्ही 9 मराठीला दिली. सातऱ्याचा पराभव हा सेना-भाजपचा पराभव नाही तर तो उदयनराजे यांचा व्यक्तिगत पराभव आहे, असं संजय राऊत (Sanjay Raut reaction on Pankaja Munde) म्हणाले.

संजय राऊत यांचे मोठे विधान

“भाजपने शरद पवार यांना टार्गेट केलं त्यांना मानणारा मोठा वर्ग ग्रामीण भागात आहे. कोणतंही नेतृत्व किंवा राजकीय पक्ष हा फोडून संपत नाही. शिवसेनेचेही काही जण फोडले गेले म्हणून शिवसेना संपली का? नाही! कुणाला फोडून एखादा पक्ष संपतो हे मानायाला मी तयार नाही.  निवडणूक आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर लढायची असते. बाहेरून आलेल्यांना मतदार स्वीकारत नाहीत. सत्ताधारी पक्षात घुसण्याची जी लाट असते त्यातले अनेक उमेदवार पराभूत झालेत”, असं संजय राऊत म्हणाले.

युतीचे राज्य येतंय, ठरलंय त्याप्रमाणे गोष्टी होतील. उद्धव ठाकरे, अमित शाह मिळून चर्चा केली आहे. सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्याबाबत लवकरच उद्धव ठाकरे बोलतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरे यांनी मोठा विजय मिळवून विधीमंडळात प्रवेश केला आहे. मी आदित्य ठाकरे यांचा आभारी आहे विधीमंडळात शिवसेनेला नेतृत्व करण्याची भूमिका ती नक्कीच पक्षाला पुढे घेऊन जाणारी आहे, असं संजय राऊत म्हणाले.

मला आनंद आहे महाराष्ट्राच्या जनतेने युतीच्या पारड्यात बहुमत टाकताना विरोधी पक्षाला महत्वाचे स्थान दिलं, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

VIDEO

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI