“तरुणाने भररस्त्यात फ्रान्सच्या अध्यक्षांच्या श्रीमुखात मारली, जनतेच्या संयमाचा कडेलोट होऊ देऊ नका, हाच संदेश”

फ्रान्समध्ये लसीकरणाचा बोजवारा उडाल्याचा राग त्याच्या मनात उफाळून आला आणि तरुणाने राष्ट्राध्यक्षांच्या श्रीमुखात लगावली. या कृत्याचा निषेधच व्हायला हवा, पण जनतेच्या संयमाचा कडेलोट होणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनीही घ्यायला हवी, असं अग्रलेखात म्हटलंय. | Sanjay Raut Saamana Editorial France President

तरुणाने भररस्त्यात फ्रान्सच्या अध्यक्षांच्या श्रीमुखात मारली, जनतेच्या संयमाचा कडेलोट होऊ देऊ नका, हाच संदेश
संजय राऊत, फान्स राष्ट्राध्यक्ष आणि नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 6:37 AM

मुंबई : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन (Emmanuel Macron ) यांना त्यांच्या देशातील तरुणाने भररस्त्यात एकच श्रीमुखात लगावली. कोरोना संकटात सर्वस्व गमावल्याचा आणि फ्रान्समध्ये लसीकरणाचा बोजवारा उडाल्याचा राग त्याच्या मनात उफाळून आला आणि त्याने हे कृत्य केले. या कृत्याचा निषेधच व्हायला हवा, पण जनतेच्या संयमाचा कडेलोट होणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनीही घ्यायला हवी. मॅक्रॉन यांच्याबाबत जे घडले त्याचा हाच संदेश आहे, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे. (Sanjay Raut Saamana Editorial France President Emmanuel Macron got slapped by a person)

अन् फाडकन मॅक्रॉन यांच्या श्रीमुखात भडकावली…!

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांना त्यांच्याच देशात एका तरुणाने भररस्त्यात श्रीमुखात भडकावली आहे. श्रीमुखात हा सभ्य संस्कारातील शब्द आहे. आपल्या भाषेत ‘थप्पड’ लगावली, थोबाड फोडले, कानफट रंगवले असे बरेच काही सांगता येईल. अध्यक्षांच्या कानफटात भडकावणे हा त्या देशाचाच अपमान आहे, पण असे माथेफिरू अनेक देशांत जागोजाग निपजत असतात. तैन-आय हर्मिटेज या छोट्या शहरात मॅक्रॉन एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी पोहोचले. तेथे जनतेच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असताना एक व्यक्ती पुढे आली. त्याने राष्ट्राध्यक्षांच्या अंगरक्षकांनाही जुमानले नाही व फाडकन मॅक्रॉन यांच्या श्रीमुखात भडकावली.

लोकशाहीचा गळा आवळण्याचा हा प्रकार

फ्रान्स हा लोकशाहीप्रधान देश आहे. संसदीय लोकशाहीस तेथे मोलाचे स्थान आहे. मॅक्रॉन हे निवडणुकीत विजयी होऊन राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. मॅक्रॉन हे कुणाला आवडत नसतील तर त्यांच्यावर टीका होऊ शकते, पण देशाच्या अध्यक्षांवर हल्ला करून लोकशाहीचा गळा आवळण्याचा हा प्रकार आहे. यापूर्वी अनेक देशांत अनेक राज्यकर्त्यांनीही अशा श्रीमुखातील भेटी स्वीकारल्या आहेत.

अनेक राज्यकर्त्यांना प्राण गमवावे लागले. आपल्याच देशात इंदिरा गांधी, राजीव गांधी, बियांत सिंग, इतकेच काय, जनरल अरुण कुमार वैद्य यांच्यासारख्या सेनानींना भररस्त्यात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ल्यांना सामोरे जावे लागले व यापैकी अनेकांना प्राण गमवावे लागले. अलीकडे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ला झाला, पण तो हल्ला पायावर निभावला. महात्मा गांधींची हत्या तर सार्वजनिक ठिकाणीच झाली. लिबियाचे राष्ट्राध्यक्ष गड्डाफी यांना तर संतप्त लोकांनी भररस्त्यात ठार मारले. अमेरिकेचे राष्ट्रपती केनेडी यांनाही माथेफिरूने ठार केले.

तरुणाने थोबाडीत का मारली, काय कारण होतं..?

कडेकोट सुरक्षाव्यवस्था असतानाही असे माथेफिरू चार पावले पुढेच असतात. त्यामानाने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना फक्त श्रीमुखातच पडली. प्राणावर बेतले नाही, पण गालावर निभावले. पण मॅक्रॉन यांचे गालफट रंगवण्याचे कारण काय? तो माथेफिरू असा का भडकला? त्या माथेफिरूने आधी मॅक्रॉन यांच्या गालावर रंग का चढवला ते समजून घेतले पाहिजे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन दक्षिण पूर्व फ्रान्सच्या द्रोम विभागात विद्यार्थी व इतर लोकांशी संवाद साधत होते. ‘कोविड-19’नंतर जीवनक्रम कसा चालला आहे, हे समजून घेत होते. तेवढ्यात हा माथेफिरू ‘अ बास ला मैक्रों’ अशा फ्रेंच भाषेत घोषणा देत पुढे सरकला. या घोषणेचा अर्थ काय? ‘मॅक्रो मुर्दाबाद!’ तो माथेफिरू भडकला.

कारण ‘कोविड 19’ काळात त्याने सर्वस्व गमावले. त्याने त्याचे आप्तस्वकीय, मित्र परिवारातल्या अनेकांना गमावले. देशाची अर्थव्यवस्था संपल्याने तो आज बेरोजगार झाला. त्याचे जगणे मुश्कील झाले. देशात व्यापक लसीकरणाचाही बोजवारा उडाल्याची ठिणगी त्याच्या मनात उसळली व त्याच ठिणगीचा स्फोट होऊन ती ठिणगी मॅक्रॉन यांच्या श्रीमुखात भडकली. या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडाच.

आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात लगावलीय

फ्रान्ससारखेच वातावरण जगातील अनेक देशांत आहे. आपला देशही या गोंधळापासून मुक्त नाही. इथे तर लसीकरणाच्या गोंधळावरून देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली आहे. हरिद्वार, वाराणसी, पाटणा येथील गंगा प्रवाहात या काळात प्रेतांचे तरंगणे व भडकलेल्या सामुदायिक चिता पाहून लोकांच्या मनात संतापाच्या ठिणग्या उडाल्याच असतील. म्हणून लोकांनी देशाच्या, राज्यांच्या सत्ताप्रमुखांच्या श्रीमुखात भडकविण्याचे उपक्रम सुरू केले नाहीत.

देशातील जनता संयमाचा बांध कधी तुटू देत नाही पण….

फ्रान्स हा हिंदुस्थानप्रमाणेच लोकशाहीवादी देश आहे. आपल्याकडे इतकी लोकशाही रोमारोमांत भिनली आहे की, सारे काही सोसूनही आपल्या देशातील जनता संयमाचा बांध कधी तुटू देत नाही. ऑक्सिजनअभावी आप्त स्वकीयांचे डोळ्यासमोर तडफडून होणारे मृत्यूही आपल्या जनतेने निमूटपणे सहन केले. कोविडच्या रुग्णांना बेड मिळो न मिळो, औषधांची, इंजेक्शन्सची टंचाई असो, लसीकरणास कितीही कालावधी लागो, पण आपल्या देशातील सोशिक जनता सरकाराविरुद्ध पेटून कधी माथेफिरूसारखी वागताना दिसत नाही. हिंदुस्थानी जनतेची ही सहनशील प्रगल्भता फ्रान्सच्या जनतेमध्ये रुजवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी आता विशेष प्रयत्न करायला हवेत!

(Sanjay Raut Saamana Editorial France President Emmanuel Macron got slapped by a person)

हे ही वाचा :

तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार, भाजपची शिवसेनेला सर्वात मोठी ऑफर

‘आता राहुल गांधींनीच भाजपात प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय’, भाजप नेत्याचा खोचक टोला

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.