संजय राऊत म्हणाले, कोण राणे माहित नाहीत, आता नारायण राणे म्हणतात, जवळ बोलावून ओळख करुन देतो!

नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळावर जाऊन गोमूत्र शिंपडून ती जागा पुन्हा 'पवित्र' केली.

संजय राऊत म्हणाले, कोण राणे माहित नाहीत, आता नारायण राणे म्हणतात, जवळ बोलावून ओळख करुन देतो!
Sanjay Raut_Narayan Rane

मुंबई : कोण नारायण राणे? यावर मला माहित नाही. आमचे शाखा प्रमुख किंवा आमदार यावर बोलतील. अतिशय स्थानिक विषय हा आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेवर भाष्य केलं. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी नारायण राणेंवर बोलणं टाळलं.

नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळावर जाऊन गोमूत्र शिंपडून ती जागा पुन्हा ‘पवित्र’ केली.

याबाबत संजय राऊत म्हणाले, “हा स्थानिक विषय आहे. आमचे शाखाप्रमुख किंवा आमदार यावर बोलतील. कोण नारायण राणे? यावर मला माहित नाही”

सोनिया गांधींच्या बैठकीवर भाष्य

देशातील मुख्य विरोधीपक्षाच्या नेत्यांची बैठक आहे. जे पक्ष राज्य स्तरावर विरोधी पक्षात काम करत आहेत, त्या मुख्यमंत्र्यांची आज बैठक आहे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत. पेगॅसस ते महागाई यासारख्या अनेक विषयावर चर्चा होणार आहे. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंड,केरळ ,छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. आज 4 वाजता ही बैठक आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

नारायण राणे यांचं उत्तर

दरम्यान, नारायण राणे कोण आहेत माहीत नाही असं म्हणणाऱ्या संजय राऊत यांना नारायण राणेंनी जोरदार उत्तर दिलं. मी ओळख करुन देईन, जवळ बोलवेन आणि ओळख करुन देईन असं नारायण राणे म्हणाले.

ज्यांना गोमूत्र शिंपडायचं आहे त्यांना शिंपडून द्या. ते स्मारक दलदलित आहे. फोटो पण साहेबांचा नीट दिसत नाही. आधी स्वतःचं मन शुद्ध करा. येऊ देणार नाही असं म्हटलं पण आम्ही गेलो तेव्हा तिथे कुणीच नव्हतं. मी जर त्यांचा पुत्र असतो तर येऊच दिलं नसतं. आणि शुद्धीकरण करायला ब्राहमण लागतात ते कुठे होते? आम्हाला सांगा आमच्याकडे ब्राहमण आहेत, आम्ही दिले असते, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला.

VIDEO : संजय राऊत आणि नारायण राणे काय म्हणाले?

संबंधित बातम्या  

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती स्थळावर नारायण राणेंनी काय आशीर्वाद मागितला?; राणेंनी केला मोठा खुलासा

Published On - 11:07 am, Fri, 20 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI