AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना यूपीएत जाणार का? महाराष्ट्रात मिनी यूपीएच सुरु; राहुल गांधींच्या भेटीपूर्वी संजय राऊतांचं वक्तव्य

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा प्रयोग हा मिनी यूपीए असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर, दुसरीकडे संजय राऊत आज राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.

शिवसेना यूपीएत जाणार का? महाराष्ट्रात मिनी यूपीएच सुरु; राहुल गांधींच्या भेटीपूर्वी संजय राऊतांचं वक्तव्य
संजय राऊत, खासदार, शिवसेना
| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 10:13 AM
Share

नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना यूपीएत जाणार या चर्चा मीडियामध्ये आहेत. आमच्यात या चर्चा झाल्या नाहीत. आम्ही त्या वृत्तपत्रातून वाचतो आणि माध्यमातून पाहतो, असं म्हटलं. राहुल गांधी यांना भेटणार आहे तो आमचा संवाद असतो. काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं आहे. तिन्ही पक्षात संवाद असावा म्हणून राहुल गांधी दिल्लीत असले तर त्यांच्याशी भेटून चर्चा करतो. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा प्रयोग हा मिनी यूपीए असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर, दुसरीकडे संजय राऊत आज राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक दुपारी दिल्लीत तीन वाजता होणार आहे.

शिवसेना गोव्यात लढणार उत्तर प्रदेशमध्ये चाचपणी सुरु

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, देशातील वातावरण यासंदर्भात चर्चा होते. पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. त्यापैकी शिवसेना गोव्यात निवडणूक लढवणार आहे. उत्तर प्रदेशात निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी सुरु आहे, असं संजय राऊत म्हणाले.

एनडीएतही भिन्न विचारांचे पक्ष

भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येऊन आघाड्या स्थापन केल्या जातात. यूपीए काय किंवा एनडीए काय भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येतात. एनडीएमध्ये राम मंदिराला विरोध असणाऱ्या पक्षांचा सहभाग होता, असं संजय राऊत म्हणाले.

यूपीए संदर्भात उद्धव ठाकरे निर्णय घेणार

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यूपीए संदर्भात निर्णय घेतील. यूपीएनं समर्थपणानं एकत्र येऊन विरोधकांनी ताकद निर्माण केली पाहिजे, असं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं मत आहे. महाराष्ट्रातील तीन पक्षांची महाविकास आघाडी म्हणजे मिनी यूपीए अस प्रयोग सुरु आहे.  महाराष्ट्रात काँग्रेससोबत एकत्र आहोत. संसदेत एकत्र आहोत. लोकसभा आणि राज्यसभेत निर्णय घेताना एकत्र आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

गोव्याचा निर्णय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे घेणार

गोव्यात तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढवणार ही नवी माहिती असून तुमच्याकडून मिळतेय, असं संजय राऊत म्हणाले. गोव्यात टीएमसीसोबत शिवसेना जाणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्र आणि गोव्याचं भावनिक आणि सांस्कृतिक नातं आहे. गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची काय ताकद आहे हे आम्हाला माहिती आहे. गोव्यातील निर्णयासंदर्भात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ठरवतील. आम्ही यापूर्वी गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबत लढलो होतो, त्यामध्ये यश आलं नव्हतं, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात आहेत. त्या दिल्लीत आल्यावर त्यांच्याशी भेट होईल, असं संजय राऊत म्हणाले.

इतर बातम्या:

कामावर हजर असलेल्यांनाच पगार मिळणार; एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांचा इशारा

MLC Election : नागपूरमध्ये काँग्रेसच्या अडचणीत वाढ, बसपा पाठोपाठ एमआयएमच्या निर्णयानं टेन्शन वाढलं

Sanjay Raut said MVA Government is Mini UPA before meeting of Rahul Gandhi

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.