“शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत, संजय राऊतांनी त्यासाठी आग्रह करावा”

कृषी आणि उद्योग क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा वेगवान प्रगतीत होईल असे सांगत राऊतांनी पवारांच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह करावा असेही मुनगंटीवार म्हणाले.

शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत, संजय राऊतांनी त्यासाठी आग्रह करावा
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 6:40 PM

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Pm Narendra Modi) हरवण्यासाठी शरद पवारांचे (Sharad Pawar) नेतृत्व सर्वांनी स्वीकारावं या संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (bjp leader sudhir mungantiwar) यांनी त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले तर वेगवान प्रगती होऊ शकते अशी कोपरखळी मारली आहे. कृषी आणि उद्योग क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा वेगवान प्रगतीत होईल असे सांगत राऊतांनी पवारांच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह करावा असेही मुनगंटीवार म्हणाले. ते चंद्रपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली आहे. (Sanjay Raut should insist Sharad Pawar to be Chief Minister said by bjp leader sudhir mungantiwar )

महाविकास आघाडी सरकारला मजबूत करण्यासाठी आणि मोदींना हरवण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यायला पाहिजे. शरद पवार हे नेतृत्व करू शकतात. ते सर्वमान्य नेते आहेत असं संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या विधानाविषयी मुनगंटीवार यांना विचारलं असता शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संजय राऊतांनीच आग्रह करावा अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी चिमटे काढले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षणाच्या उपसमितीवरुन हटवा अशीही मागणी केली आहे.

‘मराठ्यांची चिंता कमी आणि स्वपरिवाराची चिंता अधिक’

आरक्षण म्हणजे जगण्याचा अधिकार आहे. मूळ प्रश्न सुटले नाही तर अशा पद्धतीने आरक्षणाच्या मागण्या पुढे येत असतात. ज्यांच्याकडे सातत्यानं सत्ता होती त्यांनी मूळ प्रश्न सुटण्याचे नियोजन केले नाही. त्यांना मराठ्यांची चिंता कमी आणि स्वपरिवाराची चिंता अधिक होती असा टोला मराठा आरक्षणासंदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.

मागच्या सरकारने आरक्षण दिलं होतं ते टिकवणं गरजेचं होतं. आता कोर्टातही जी तयारी आवश्यक होती ती झाली नाही. आणि सर्व वेळ राजकारणात घालवला जात असून प्रश्नावर उत्तर नव्हे तर पुन्हा एक प्रश्न विचारला जातोय असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची मदत सरकार का स्वीकारत नाही? त्यांनाही या प्रक्रियेत सामावून घेण्यात काय वावगे आहे? असाही प्रश्न मुनगंटीवार यांनी विचारला.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत खडसेंच्या ईडीची नोटीसविषयी प्रश्न विचारला असता मुनगंटीवार यांनी प्रतक्रिया देण्याचं टाळलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस मिळाल्याच्या या बातमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुधीर मुनगंटीवार यांनी ईडी ही स्वतंत्र चौकशी यंत्रणा असून त्या नोटीसचा आपल्याला अभ्यास नसल्याने त्यावर भाष्य करणार नसल्याचे ते म्हणाले. (Sanjay Raut should insist Sharad Pawar to be Chief Minister said by bjp leader sudhir mungantiwar )

इतर बातम्या –

भोसरी भूखंड प्रकरणात नोटीस, 30 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहणार, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

भुजबळांचा संजय राऊतांना पाठिंबा, म्हणाले, ‘एकत्र लढलं तर भाजपाला रोखणे शक्य’

(Sanjay Raut should insist Sharad Pawar to be Chief Minister said by bjp leader sudhir mungantiwar )

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.