Anil Bonde : संजय राऊत यांनी बोलत रहावं; ते अप्रत्यक्षरित्या आमचंच काम करतायेत, अनिल बोंडेंचा चिमटा

| Updated on: Jul 25, 2022 | 10:39 AM

भाजप (BJP) नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी पुन्हा एकदा शिवसेना (Shivsena) आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी बोलत राहावं, त्याचा फायदा आम्हाला होत असल्याचे बोंडे यांनी म्हटलं आहे.

Anil Bonde : संजय राऊत यांनी बोलत रहावं; ते अप्रत्यक्षरित्या आमचंच काम करतायेत, अनिल बोंडेंचा चिमटा
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : भाजप  (BJP) नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी पुन्हा एकदा शिवसेना (Shivsena) आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी बोलत राहावं, त्याचा फायदा आम्हाला होत आहे. ते अप्रत्यक्षरित्या आमचंच काम करत असल्याचे बोंडे यांनी म्हटले आहे. त्यांनी जर राष्ट्रवादीकडून ठरवून घेतलं असेल तर ते कदाचीत अंतिम उद्दिष्ट साध्य  करतील. त्यामुळे राऊत यांनी हवं तेवढं बोलत रहावं अशी टीका बोंडे यांनी केली आहे. दरम्यान यावेळी अनिल बोंडे यांनी उद्धव ठाकरेंकडून भाजपावर सुरू असलेल्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाने शिवसेना फोडली, पैशांचा वापर झाला अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून सुरू आहे. या टीकेला अनिल बोंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा कार्यकर्ते आणि पक्षप्रमुखांमध्ये दुरावा निर्माण होतो तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, असं बोंडे यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हटलंय बोंडे यांनी?

अनिल बोंडे यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘टीव्ही  9’ शी  संवाद साधला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंकडून भाजपावर सुरू असलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपाने पैशाचा वापर करून शिवसेना फोडली असा आरोप केला. मात्र ठाकरे यांच्या या आरोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील हे सर्व कशाप्रकारे घडले ते सांगितले. पक्षप्रमुख हा कार्यकर्ते आणि पक्षामधील दुवा असतो. मात्र जेव्हा कार्यकर्ते दुरावले जातात तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते. अनेक मतदारसंघात शिवसेनेच्या नेत्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादीची कुरघोडी सुरू होती. नेत्यांचं, कार्यकर्त्याचं म्हणन ऐकूण घेण्यात आले नाही. परिणामी कार्यकर्ते पक्षापासून दुरावले असं बोंडे यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

बाळासाहेब ठाकरे हा एक विचार

बाळासाहेब ठाकरे यांचं नाव न वापरता मत मिळून दाखवा असं उद्धव ठाकरे यांनी अनेकदा एकनाथ शिंदे आणि शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदार, खासदारांना म्हटलं आहे. याव देखील बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे ही एक व्यक्ती नसून, विचार आहे. त्यामुळे त्यांचे नाव कोणालाही घेता येऊ शकते असं बोंडे यांनी म्हटलं आहे.