विश्वादर्शक ठराव जिंकल्यानंतर संजय राऊतांचे पहिले ट्विट

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर नुकतंच शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट केले (Sanjay Raut tweet) आहे.

विश्वादर्शक ठराव जिंकल्यानंतर संजय राऊतांचे पहिले ट्विट

मुंबई : गेल्या महिन्याभरातील नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात अखेर महाविकासआघाडीने सत्ता स्थापन केली (Sanjay Raut tweet) आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यामुळे ठाकरे सरकार हे अग्निपरीक्षेत पास (Sanjay Raut tweet) झाले. या विश्वासदर्शक ठरावावेळी महाविकासआघाडीच्या बाजूने 169 सदस्यांची मत पडली. हा विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर नुकतंच शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट केले (Sanjay Raut tweet) आहे.

“मजबूत होने का मजा ही तब है, जब सारी दुनिया कमजोर करने पर तुली हो…”अशी शायरी संजय राऊत यांनी ट्विट केली. त्यांच्या या ट्विटमुळे त्यांनी भाजपला पुन्हा टोला लगावला असल्याचे बोललं जात (Sanjay Raut tweet) आहे.

गेल्या महिन्याभरातील राजकीय घडामोडीमध्ये संजय राऊत यांनी फार महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. काल विश्वासदर्शक ठरावापूर्वीही संजय राऊत यांनी ट्विट केलं होतं. बहुमत दिन..170+++++, हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है… जमाने से हम नहीं असे हे ट्विट होते. या ट्विटमधून त्यांनी आमच्याकडे 170 आमदारांचा पाठिंबा आहे. आम्हीच विधानसभेत बहुमत सिद्ध करु असा दावा त्यांनी या ट्विटमधून केला (Sanjay Raut tweet) होता.

यानंतर काल दुपारी 2 वाजता विधानसभेतील विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनात महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने ठाकरे सरकार हे अग्निपरीक्षेत पास झाले आहे. महाविकासआघाडीच्या बाजून 169 सदस्यांची मतं पडली. त्यामुळे त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. यादरम्यान 4 सदस्य तटस्थ राहिले.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी हा विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला नवाब मलिक, सुनिल प्रभू, जयंत पाटील या तिन्ही नेत्यांनी अनुमोदन केले.

  • विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने – 169
  • विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात – शून्य
  • तटस्थ – 4
  • विश्वासदर्शक ठराव संमत

दरम्यान विश्वादर्शक ठरावावेळी 4 सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. यात मनसे 1, माकप 1, तर एमआयएमच्या दोन आमदारांचा समावेश आहे. कल्याण ग्रामीणमधून निवडून आलेले मनसे आमदार प्रमोद पाटील, डहाणूमधून निवडून आलेले माकपचे विनोद निकोले हे दोन सदस्य तटस्थ राहिले. तसेच एमआयएमचे धुळे शहर मतदारसंघातून फारूक शाह तर मालेगाव मध्य मतदारसंघातून मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. मात्र त्यानंतर त्यांनी पाठिंबा (Sanjay Raut tweet) दर्शवला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *