AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : मी शस्त्रक्रियेच्या गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

ज्यांनी माझ्या दगाबाजी केली आहे. त्यांनी स्वत:च्या बापाच्या नावानी मते मागावीत. आमच्या बापाच्या नावाने मते मागू नका.

Uddhav Thackeray : मी शस्त्रक्रियेच्या गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
Image Credit source: twitter
| Updated on: Jul 26, 2022 | 7:28 AM
Share

मुंबई – महाराष्ट्रातल्या राजकारणात (Maharshtra Politics) मागच्या महिना भरापासून रोज नव्या घडामोडी उजेडात येत आहेत. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप पक्ष प्रवेश अशा घटनांचा समावेश आहे. शिंदे गट वेगळा झाल्यापासून महाराष्ट्रात शिवसेना (Shivsena) अस्थिर झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पक्ष आणि चिन्ह कोणाचं याबाबत न्यायालयात प्रकरण सुरु आहे. लढाई दोन्ही बाजूकडून अस्तित्वाची झाली आहे. त्यातचं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली आहे. त्याची चर्चा अधिक आहे. उद्धव ठाकरेंनी फुटलेल्या आमदारांवरती सडकून टीका केली आहे. आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या राजकीय घडामोंडीची त्यांनी उत्तरे दिली आहेत. माझे सरकार गेले, मुख्यमंत्री पद गेले याची अजिबात खंत नाही. पण माझी माणसं दगाबाज निघाली असं त्यांनी वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे हॉस्पीटलमध्ये असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न केला हे देखील त्यांनी मुलाखतीत सांगितले आहे.

महाराष्ट्रातली जनता निवडणुकीची वाट पाहत आहे

ज्यांनी माझ्या दगाबाजी केली आहे. त्यांनी स्वत:च्या बापाच्या नावानी मते मागावीत. आमच्या बापाच्या नावाने मते मागू नका. त्याचबरोबर शिवसेना कायद्याची आणि रस्त्यावरती लढाई जिंकेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातली जनता निवडणुकीची वाट पाहत आहे. शिवसेना कोणाची याचे पुरावे द्यायची गरज नाही. लोकं म्हणतात निवडणुका येऊ द्या आम्ही यांना पुरुन टाकतो. फुटीर आमदारांच्या टीकेला देखील त्यांनी जबरदस्त उत्तरे दिली आहेत.

उद्धव ठाकरेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

होय सडलेली पानं झडताहेत. ज्यांना झाडाकडून सगळं काही मिळालं, सगळा रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीपणा होता. ती सगळं पाणी झाडाकडुन पडत आहेत. आणि हे बघा झाडं कस उघडंबोकडं झालंय असं दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण दुसऱ्या दिवशी माळीबुवा येतो, ती पानगळ केराच्या टोपलीत घेतो आणि घेऊन जातो असं उदाहरण देखील त्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. शिवसेनेचे आमदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची सामना पेपरसाठी मुलाखत घेतली आहे.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.