AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुरुंगात कसाबचे भूत… अनेक रात्री जागून काढल्या, पण… संजय राऊत यांनी सांगितलेला किस्सा काय?

संजय राऊतांच्या "नरकातला स्वर्ग" या पुस्तकात त्यांच्या आर्थर रोड तुरुंगातील अनुभवांचे आणि राजकीय घडामोडींचे वर्णन आहे. पुस्तकात अजमल कसाबच्या भूताच्या कहाणींसह तुरुंगातील अंधश्रद्धा आणि विदारक वास्तव यांचाही समावेश आहे. राऊत यांनी कसाबच्या कोठडीचीही माहिती दिली असून, त्यांच्या तुरुंग जीवनातील अनेक प्रसंगांचे वर्णन केले आहे.

तुरुंगात कसाबचे भूत... अनेक रात्री जागून काढल्या, पण... संजय राऊत यांनी सांगितलेला किस्सा काय?
तुरुंगात कसबाचे भूत... संजय राऊत यांनी सांगितलेला किस्सा काय?Image Credit source: social media
| Updated on: May 18, 2025 | 2:49 PM
Share

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. राऊत यांनी या पुस्तकातून तुरुंगातील जीवन, त्यांचे तुरुंगातील अनुभव आणि भूतकाळातील राजकीय घडामोडींवर तसेच पडद्यामागील घटनांवर भाष्य केलं आहे. त्यामुळे हे पुस्तक राजकीय वादळ निर्माण करणारं ठरलं आहे. या पुस्तकात अनेक गमंतीजमती आहेत. तसेच तुरुंगातील विदारकता आणि अंधश्रद्धेलाही वाचा फोडण्यात आली आहे. अतिरेकी अजमल कसाब याचं तुरुंगातील भूत हे सुद्धा त्यातीलच एक प्रकरण आहे. तुरुंगात कसाबचं भूत कसं निघतं आणि त्याचा शोध घेण्यासाठी राऊत यांनी अनेक रात्री कशा जागून काढल्या याचा रंजक किस्साच या पुस्तकात आला आहे.

रुपेश कुमार सिंह हे लेखक आणि पत्रकार तुरुंगात होते. संजय राऊत यांची तुरुंगात रुपेश कुमार सिंह यांच्याशी भेट झाली. यावेळी रुपेश कुमार यांनी तुरुंगात अंधविश्वास असल्याचं सांगितलं. तुरुंगातील अंधविश्वास संपवण्याऐवजी तुरुंग प्रशासन तो वाढवण्यावरच अधिक भर देतं. कैद्यांना वाचायला पुस्तक मिळणं हा त्यांचा मौलिक अधिकार आहे. पुस्तके मिळत नाहीत. पण भुतं पळवण्यासाठी पूजा-पाठ करण्याच्या सामानाची व्यवस्था तुरुंगात केली जाते, असं रुपेश कुमार यांनी राऊत यांना सांगितलं होतं.

राऊत म्हणतात…

या पुस्तकात राऊत म्हणतात, हा अंधविश्वास आणि भूत-प्रेताच्या कहाण्या आर्थर रोडमध्येही धुमाकूळ घालतात. कसाबचे भूत निघते ही कथा आहेच. पण त्याच कसाबच्या बॅरकमध्ये मी आणि अनिल देशमुख राहत होतो. मी म्हणालो, कसाबला इथून पुण्याला नेले, तेथेच फासावर लटकवले आणि येरवडा कारागृहात त्याला गाडले. त्यामुळे त्याचे भूत तेथे असायला हवे. पुण्यातून मुंबईला ते भूत रोज कशाला येईल?

कसाबला प्रत्यक्ष पाहणारे अनेक जण तेव्हा आर्थर रोड जेलमध्ये होते. ते कसाबच्या बाबतीत अनेक दंतकथा सांगतात. कसाबचे भूत शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला. रात्री जागून काढल्या, पण कसाब दिसला नाही. यार्डामध्ये दिवे कधीच विझत नाहीत. लख्ख प्रकाशात भुते फिरकत नाहीत आणि आमच्यासारखे लोक सरकारला भुतासारखे वाटत असल्याने कसाबच्या कोठडीत आम्हाला डांबून ठेवले होते, असं राऊत म्हणतात.

कसाबची कोठडी

यावेळी राऊत यांनी कसाबच्या कोठडीतील माहितीही दिली आहे. मी 12 नंबर यार्डात होतो. आर्थर रोड जेलच्या सगळ्यात शेवटी हे यार्ड आहे. त्या यार्डात शिरण्यासाठी तीन स्वतंत्र दरवाजे आहेत. चारही बाजुंनी बुलेटप्रुफ आणि बॉम्बप्रुफ भिंत तसेच लोखंडी कवच आहे. हे का? कारण कसाब या यार्डात होता. कसाबचे वास्तव्य असलेल्या यार्डातच मला आणि देशमुखांना ठेवलं होतं. बाहेरचा संपर्क नाही. सूर्यकिरणांची तिरीप नाही, असं राऊत यांनी म्हटलंय.

हीपण वाचा : या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे, परदेशी जाणाऱ्या शिष्टमंडळावरून संजय राऊत यांचं विधान

मी तळमजल्यावर होतो. तेथून एक जिना वर गेलेला. त्यातील एका खोलीत कसाबचे वास्तव्य होते. आता ती खोली बंद आहे. त्या खोलीत आजही कसाबचे कपडे, त्याची पाठीवर लटकलेली बॅग आणि एके -47 गन आहे. कसाबच्या सुरक्षेसाठी इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसांची एक तुकडी होती आणि त्याच्यासाठीच सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते. तळमजल्यावर आयटीबीपीचे पथक तैनात असे आणि आतमध्ये मुंगीलाही शिरता येणार नाही, अशी सुरक्षा व्यवस्था होती. कसाबला याच यार्डातून शेवटी फाशी देण्यासाठी नेण्यात आले होते. परंतु कसाबच्या कटू आठवणींचे ठसे ते आजही जिवंत आहेत, असं या पुस्तकात म्हटलंय.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.