या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे, परदेशी जाणाऱ्या शिष्टमंडळावरून संजय राऊत यांचं विधान
तुम्हाला कळतं नाही पण तुम्ही (सरकार) काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करत आहात, जगात तुम्ही हा प्रश्न घेऊ जात आहात, याचा अर्थ पंतप्रधान कमजोर आहेत. 200 देश फिरले पण एकही देश पाठिशी उभा राहिलेला नाही म्हणून तुमच्यावरती ही नौंटकी करण्याची वेळ आली आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

भारताने दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेत त्याचा नायनाट करण्यााच्या मोहिमेअंतर्गतच संसदीय कामकाज मंत्रालयाद्वारे दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका मांडण्यासाठी परदेशात एक शिष्टमंडळ पाठवण्यात येणार आहे. त्यामध्ये देशातील विविध पक्षातील अनेक खासदारांचा समावेश असून ते विविध देशात जाऊन पाकचा बुरखा फाडणार आहेत. ऑपरेशन सिंदूर करायची भारतावर वेळ का आली हेही ते शिष्टमंडळ स्पष्ट करत दहशतवादाविरोधत संपूर्ण देश एकजुटीने उभा असल्याते दाखवून देणार आहे.
मात्र शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारतर्फे पाठवण्यात येणाऱ्या या डेलिगेशनवरच टीका केली आहे. या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे, असं म्हणत संजय राऊतांनी तोफ डागली आहे.
हा विषय भाजपाने राजकीय केला आहे, त्यांना प्रत्येक विषयाचे राजकारण करण्याची खाज आहे. खरंतर इतक्या घाईने हे डेलिगेशन परदेशात पाठवण्याची गरज नव्हती, असे राऊत म्हणाले. काश्मीर प्रश्न आणि ऑपरेशन सिंदूर बाबत विशेष अधिवेशन घ्यावं आणि चर्चा करावी ही मागणी तसेच भारताची याप्रकरणात ट्रम्प यांच्यासोबत काय चर्चा झाली हे सांगावे,ही दुसरी मागणी. अशा विरोधी पक्षाच्या दोन प्रमुख मागण्या होत्या, पण तुम्ही (सरकार) त्यावर बोलायला तयार नाही,माहिती देत नाही. शिष्टमंडळासाठी किरण रिजीजूंनी त्यांच्या गोतावळ्यातीलच नाव काढली अशी टीकाही राऊतांनी केली.
शरद पवार गट, शिंदे गटापेक्षा लोकसभेत शिवसेनेचे जास्त सदस्य
शिवसेनेचा प्रतिनिधी पाठवताना आम्हाला विचारलं का, या डेलिगेशनमध्ये तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, आरजेडीचं कोणी दिसतंय का ? मग सर्वपक्षीय शिष्टमंडळ जातं हे ते कोणत्या आधारावर सांगतात, असा सवाल राऊतांनी विचारला. लोकसभेत शिवसेनेचे9 सदस्य आहेत. एकनाथ शिंदे गटापेक्षा आणि शरद पवारांच्य गटापेक्षाही आमचा एक सदस्य तरी जास्त आहे. मग आमचा सदस्या पाठवताना विचारलं का नाही असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला. शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी आम्हाला देखील मिळायला पाहिजे, आमचे सदस्य जास्त आहेत.
याचा अर्थ ते इथे देखील राजकारण करत आहेत. सरकारी खर्चाने हे वऱ्हाड पाठवायची तशी गरज नव्हती, हे वऱ्हाड निघालं आहे, युरोपला, आफ्रिकेला, पण ते जाऊन काय करणार आहेत? परदेशात आपला वकिलाती आहेत, हाय कमिशन आहे, ते हे काम करत आहेत. मग गरज काय ? उगाच आपलं पाठवायचं असं म्हणत राऊतांनी या निर्णायवर टीका केली.
म्हणून तुमच्यावरती ही नौंटकी करण्याची वेळ आली…
तुम्हाला कळतं नाही पण तुम्ही (सरकार) काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करत आहात, जगात तुम्ही हा प्रश्न घेऊ जात आहात, याचा अर्थ पंतप्रधान कमजोर आहेत. 200 देश फिरले पण एकही देश पाठिशी उभा राहिलेला नाही म्हणून तुमच्यावरती ही नौंटकी करण्याची वेळ आली आहे, असा कठोर शब्दांत राऊतांनी सुनावलं. INDIA ब्लॉकचे जे सदस्य चालले आहेत त्यांनी या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली. तुम्ही सरकारच्या ट्रॅपमध्ये अडकताय. सरकारने जे गुन्हे आणि पाप केलं आहे, त्याची वकिली करायला तुम्ही चालला आहात, देशाची वकिली करायला जात नाहीयात तुम्ही, असं राऊत म्हणाले,
दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्याची क्षमता निर्माण झालेली असताना, प्रेसिंडेट ट्रम्पने एकतर्फी सीझफायर जाहीर करून पाकिस्तानच्या दहशतवादाला मोकाट सोडलंय, अशी घणाघाणी टीकाही राऊतांनी यावेळी केली. ट्रम्प यांना मध्यस्थी करण्याची गरज का भासली हा प्रश्न तुम्ही वॉश्गिंटनला जाऊन विचारणार असाल तर जा असंही राऊत म्हणाले.