Nitesh Rane | दिलासा की उसासा, हे ठरण्याआधी सिंधुदुर्ग कोर्टात नेमकं 2 वकिलांमध्ये काय युक्तिवाद झाला?

अक्षय कुडकेलवार

अक्षय कुडकेलवार | Edited By: सागर जोशी

Updated on: Jan 31, 2022 | 5:50 PM

सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज (Bail application) फेटाळल्यानंतर त्यांना खालच्या कोर्टात जाण्याचे आदेश दिले होते. तसंच त्यांना अटकेपासून संरक्षणही देण्यात आलं होतं. त्यानुसार नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या या अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली आहे.

Nitesh Rane | दिलासा की उसासा, हे ठरण्याआधी सिंधुदुर्ग कोर्टात नेमकं 2 वकिलांमध्ये काय युक्तिवाद झाला?
नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्गातील स्थानिक शिवसेना नेते संतोष परब हल्ला (Santosh Parab Attack) प्रकरणात भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटक होणार की दिलासा मिळणार हे उद्या स्पष्ट होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात (Sindudurga District Court) या प्रकरणाची सुनावणी आज पार पडली. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आज पूर्ण झाला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद शांतपणे ऐकून घेतला. दरम्यान, कोर्टाची वेळ संपल्यानं या प्रकरणाचा निकाल उद्या दुपारी 3 वाजता लागणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज (Bail application) फेटाळल्यानंतर त्यांना खालच्या कोर्टात जाण्याचे आदेश दिले होते. तसंच त्यांना अटकेपासून संरक्षणही देण्यात आलं होतं. त्यानुसार नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या या अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली आहे.

नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालात सकाळपासून सुनावणीला सुरुवात झाली. सुमारे साडे पाच तास ही सुनावणी चालली. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. उद्या या प्रकरणी कुठल्याही प्रकारचा युक्तीवाद होणार नाही. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ‘नितेश राणे या कटात सहभागी होते. त्यांच्यात सुचनेवरुन हा हल्ला झाला. त्यामुळे नितेश राणेंना आधी अटक करुन मग त्यांच्या जामीनावर सुनावणी व्हावी. तसंच नितेश राणे यांचा शरण अर्ज अद्याप देण्यात आला नाही मग ते शरण आले असं म्हणता येणार नाही’, असा युक्तीवाद केलाय.

सरकारी वकिलांचा युक्तीवाद काय?

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिलेल्या माहितीनुसार, माननीय न्यायालयाने दोन्ही पक्षाचं मत ऐकून घेतलं. उद्या त्यावर ऑर्डर देण्यात येणार आहे. जामीन अर्ज हा मेंटेनेबल आहे का? त्याच्यावर ऑर्डर करता येईल का? मेरिट्सवर आरोपीवर केस काय आहे? यावर आज दोन्ही बाजूने युक्तीवाद झाला. उद्या सर्वांना दुपारी 3 वाजता हजर राहण्यास सांगितलं आहे. आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की, आरोपी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 10 दिवसाच्या आत या न्यायालयासमोर आला म्हणजेच तो न्यायालयाच्या कस्टडीत आला. त्यामुळे त्याला कस्टडीत घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल, अशी आमची न्यायालयाकडे मागणी होती. तावर न्यायालयाने सांगितलं की उद्या दुपारी 3 पर्यंत मी सगळ्यांचं सगळं म्हणणं तहकूब ठेवतो. तेव्हा यावर ऑर्डर करेल, असं न्यायालयाने सांगितल्याचं घरत म्हणाले.

संतोष परब यांच्यावरील हल्ल्यामुळं वाद

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे नेते संतोष परब यांच्यावर झाला होता. यानंतर संतोष परब यांनी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने तो फेटाळला आणि खालच्या कोर्टात जाण्याचे आदेश त्यांना दिले होते. मात्र, त्यांना अटकेपासूनही संरक्षण देण्यातं आलं होतं. संतोष परब यांच्याबाजूनं शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासह अनेक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. या प्रकरणावरुन पुन्हा राणे विरुद्ध सेना असा संघर्ष यामुळे निर्माण झालाय.

इतर बातम्या :

Nitesh Rane : संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणेंना अटक होणार?

Nitesh rane : नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून चौकशी, काय आहे संतोष परब हल्ला प्रकरण? वाचा सविस्तर

Breaking : आमदार नितेश राणेंना दिलासा नाहीच, जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला, पुढे काय?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI