‘अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार?’ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार उदयनराजेंचा सवाल

साताऱ्यात आज आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले एकाच मंचावर आले होते.

'अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार?' मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार उदयनराजेंचा सवाल
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 2:26 PM

सातारा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. दुसऱ्यांचा लाभ काढून आम्हाला देऊ नका. सर्वांना न्याय दिला मग आम्हाला का नाही? असा सवाल विचारातानाच, अंत पाहू नका. एकदा का उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार आणि हा उद्रेक नक्की होणार, असा इशाराही उदयनराजे यांनी राज्य सरकारला दिला आहे. साताऱ्यात आज आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले एकाच मंचावर आले होते.(MP Udayanraje Bhosle on Maratha Reservation)

‘राज्याच्या ज्येष्ठ नेत्यांनी लक्ष घालावं’

मराठा समाज सधन आहे असं सर्वांना वाटतं. पण मराठा समाजातील मजुरांची, विद्यार्थ्यांची परिस्थिती फार वाईट आहे. जास्त मार्क मिळवूनही अॅडमिशन मिळत नसेल तर हा मराठा समाजावरील अन्याय आहे. लोकप्रतिनिधी तुमच्या अधिकारासाठी तुम्हाला साथ देणार नसतील तर तुम्हीपण तुमच्यासाठी लढणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहायला हवं, असं आवाहन उदयनराजे यांनी मराठा समाजाला केलंय. इतकच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव न घेता महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते. त्यांनी अनेक वर्ष राज्याचं नेतृत्व केलं. त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालायला हवं, असं आवाहन केलं आहे.

नरेंद्र पाटील यांनी आज आण्णासाहेब फाऊंडेशनची स्थापना केली. त्यांनी त्यांचं आयुष्य मराठा समाजासाठी अर्पण केलं. आण्णासाहेब पाटील यांच्या कामाबद्दल मी ऐकूण आहे. त्यांचं काम खूप मोठं आहे. मराठा आरक्षणाबाबतचं राजकारण थांबलं पाहिजे, लोकप्रतिनिधींनी विचार केला पाहिजे. यांना कोणती भाषा कळते हे समजत नाही. लोकांनी मोर्चे काढले तरी यांना कळत नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रियाही उदयनराजेंनी व्यक्त केलीय.

 हे सरकार खोडा घालतंय: शिवेंद्रराजे

कुणी मान्य करा अथवा नका करू. पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि टिकवलं, पण हे सरकार आरक्षणात खोडा घालतंय, अशी टीका छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी आज केली. शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवलं. आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचे कार्य हे मराठा समाज एकत्र आणण्यासाठी होणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. नरेंद्र पाटील यांना आपण साथ दिली पाहिजे, असं शिवेंद्रराजे म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं हे सर्वांना मान्य करावं लागेल. फडणवीसांनी नुसतं आरक्षण दिलं नाही तर ते कोर्टातही टिकवलं होतं. नंतर हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात गेलं. पण मात्र राज्य सरकारला ते टिकवता आलं नाही, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण दिलं आणि टिकवलं; पण हे सरकार खोडा घालतंय: शिवेंद्रराजे

मंत्री वडेट्टीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

MP Udayanraje Bhosle on Maratha Reservation

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.