AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satyajeet Tambe | ‘ती’ योजना आघाडी सरकारची की शिवसेना-राष्ट्रवादीची?, सत्यजीत तांबेंचा थेट सवाल

महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत  केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, सत्यजीत तांबे यांनी सवाल उपस्थित केला आहे. Satyajeet Tambe

Satyajeet Tambe | 'ती' योजना आघाडी सरकारची की शिवसेना-राष्ट्रवादीची?, सत्यजीत तांबेंचा थेट सवाल
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 16, 2020 | 11:36 AM
Share

मुंबई : महाविकास आघाडीतील कुरबुर पुन्हा एकदा समोर आली आहे. युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी थेट महाविकास आघाडीला प्रश्न उपस्थित केला आहे. महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत  केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, सत्यजीत तांबे यांनी सवाल उपस्थित केला आहे. “महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी का होत नाही”, असे प्रश्न सत्यजीत तांबे यांनी विचारले आहेत. (Satyajeet Tambes question over Mahajobs portal)

सत्यजीत तांबे यांनी ट्वीट करुन आपली खदखद व्यक्त केली. सत्यजीत तांबे म्हणाले, “महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची आणि त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे”. (Satyajeet Tambes question over Mahajobs portal)

सत्यजीत तांबे यांनी प्रश्न उपस्थित करुन, महाविकास आघाडीतील कुरबुर पुन्हा एकदा उघड केली आहे. महाविकास आघाडी सरकार असताना, महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवर केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नेत्यांचे फोटो आहेत. यामध्ये काँग्रेस नेत्याचा फोटो नाही. सत्यजीत तांबे यांनी जे ट्वीट केलं आहे, त्या जाहिरातीवर केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कौशल विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांचे फोटो आहेत.  हे सर्व त्या विभागांशी संबंधित मंत्री आहेत.

यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा फोटो असणे अपेक्षित होतं, असं सत्यजीत तांबे यांचं म्हणणं असू शकतं.  मात्र त्यांचा किंवा अन्य कोणत्याही काँग्रेस नेत्याचा फोटो नसल्याने, सत्यजीत तांबे यांनी थेट प्रश्न विचारुन महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? असा सवाल विचारला.

वेबसाईटच्या होमपेजवर तिन्ही पक्षाच्या नेत्यांचे फोटो दरम्यान, सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस नेत्यांचे फोटो नसल्याने नाराजी व्यक्त केली असली, तरी http://mahajobs.maharashtra.gov.in या वेबसाईटच्या होमपेजवर डावीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे फोटो आहेत. तर उजव्या बाजूला संबंधित खात्याचे मंत्री म्हणजेच उद्योग मंत्री सुभाष देसाई (शिवसेना), कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी) आणि कौशल विकास मंत्री नवाब मलिक (राष्ट्रवादी) यांचे फोटो आहेत.

महाजॉब्स पोर्टल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसापूर्वी म्हणजेच 6 जुलै रोजी “महाजॉब्स” हे संकेतस्थळाचं लोकार्पण केलं. युवकांना रोजगार आणि कंपन्यांना कामगार मिळवण्यासाठी एकच प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे.

संबंधित बातम्या 

Mahajobs | उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना संधी, एमआयडीसीच्या ‘महाजॉब्स पोर्टल’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 

Follow Us
प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
Video : प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
Devendra Fadnavis : TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन, दुष्काळाचं सावट दूर करण्यासाठी गणरायाला घातलं साकडं
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
Maharashtra Drought | महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? मंत्री बाबासाहेब पाटलांची मोठी माहिती; पण दत्तात्रय भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण