शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याची मिझोरामच्या राज्यपालपदी वर्णी निश्चित

मुंबई : स्पष्ट बहुमत घेत केंद्रात सत्ता स्थापन करत असलेल्या नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) मित्रपक्षांना कोणती मंत्रीपदे आणि इतर महत्वाची पदे मिळणार याकडेही अनेकांचे लक्ष लागून आहे. अशातच शिवसेनेला मंत्रीपदासोबतच राज्यपालपदही दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांची मिझोरामच्या राज्यपालपदी  वर्णी लागल्याचे …

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याची मिझोरामच्या राज्यपालपदी वर्णी निश्चित

मुंबई : स्पष्ट बहुमत घेत केंद्रात सत्ता स्थापन करत असलेल्या नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) मित्रपक्षांना कोणती मंत्रीपदे आणि इतर महत्वाची पदे मिळणार याकडेही अनेकांचे लक्ष लागून आहे. अशातच शिवसेनेला मंत्रीपदासोबतच राज्यपालपदही दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांची मिझोरामच्या राज्यपालपदी  वर्णी लागल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.

शिवसेनेला मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कमी मंत्रीपदे मिळाली असली, तरी भाजपकडून शिवसेनेला राज्यपालपद देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार शिवसेनेने मिझोरामच्या राज्यपालपदासाठी लिलाधर डाके यांचे नाव निश्चित केले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवणाऱ्या भाजपप्रणित एनडीए सरकारचा आज शपथविधी सोहळा आहे. नरेंद्र मोदी आज पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यासोबत, काही मंत्रीही शपथग्रहण करतील. शिवसेनेकडून आज एकच मंत्री शपथ घेणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीला रवाना

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी ‘मातोश्री’वरून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. हजारो पाहुण्यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी) सायंकाळी 7 वाजता मोदींचा शपथविधी होईल. अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांसह दिग्गजांना या शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *