राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करणारच, केंद्राने जबाबदारी झटकू नये : शंभुराज देसाई

राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यापासून मागे हटणार नाही मात्र, केंद्राने जबाबदारी झटकून चालणार नाही, असे देसाई म्हणाले आहेत. (Shambhuraj Desai said  MVA govt will help to rain affected people)

राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करणारच, केंद्राने जबाबदारी झटकू नये : शंभुराज देसाई

मुंबई : महापूर आणि अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून प्रत्यक्ष पाहणी केली आहे. पिकांचे नुकसान झालं आहे, प्राथमिक माहिती घेऊन नुकसान भरपाई दिली जाईल, असे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले. राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यापासून मागे हटणार नाही मात्र, केंद्राने जबाबदारी झटकून चालणार नाही, असे देसाई म्हणाले आहेत. (Shambhuraj Desai said  MVA govt will help to rain affected people)

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोलापूरमध्ये पाहणी केली आहे. उद्या ते उस्मानाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पाहणी दौरा सुरू आहे. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य व केंद्र सरकार दोघांनी मदत करण्याची गरज देसाईंनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती खराब आहे म्हणून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकार मागे हटणार नाही, असे शंभुराज देसाईंनी स्पष्ट केले. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी कॅगचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे करण्यात येत आहे. चौकशी कोणाला गप्प करण्यासाठी केली जात नसल्याचे शंभुराज देसाईंनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राला केंद्राकडून मिळणार नाही, असे फडणवीस यांना अपेक्षित आहे का? असा सवाल देसाईंनी फडणवीसांना केला. कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार सरकार करत आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या कायद्यांत बदल व्हायला पाहिजे, असं देसाई यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

Shambhuraj Desai | महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकणार : शंभुराज देसाई

Headlines | महाविकासआघाडीचे सरकार 10 वर्ष टिकेल : शंभुराज देसाई | 5 PM

(Shambhuraj Desai said  MVA govt will help to rain affected people)

Published On - 5:21 pm, Tue, 20 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI