AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांचा बच्चू कडू यांना फोन, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? वाचा…

बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवारांचा बच्चू कडू यांना फोन, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? वाचा...
Sharad Pawar and Bachchu Kadu
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 10, 2025 | 8:18 PM
Share

माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला यांच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन ते आंदोलनाला बसले आहेत. काहीही झालं तरी मी अन्नाचा एकही कण घेणार नाही, असं बच्चू कडू यांनी जाहीर केलं आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बच्चू कडू यांनी फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी दोघांमध्ये काय चर्चा झाली ते जाणून घेऊयात.

दोघांमध्ये काय बोलणं झालं?

शरद पवार यांनी आज आंदोलनाला बसलेल्या बच्चू कडू यांना फोन करत त्यांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली. तसेच आंदोलनाबाबत माहिती विचारली. यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले की, “कलेक्टर आणि एसपी भेटायला आले होते, तसेच पालकमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग आयोजित करुन देऊ अशी माहिती दिली आहे. मात्र मी मीटिंगच्या बदल्यात उपोषण मागे घेणार नाही. आम्हाला भेट नको, निर्णय हवा आहे.” यानंतर बच्चू कडू यांनी तुमच्याकडून उद्या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी आलं तर बरं होईल असं म्हटलं.

मनोज जरांगे यांचा बच्चू कडू यांना पाठिंबा

बच्चू कडू यांची प्रमुख मागणी ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची आहे. त्यांच्या याच मागणीला मनोज जरांगे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. उद्या (11 जून) दुपारी 4 वाजता मनोज जरांगे बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत. यावेळी दोघांमध्ये काय चर्चा होते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बच्चू कडू यांचे दोन किलो वजन घटले

बच्चू कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. या आंदोलनामुळे त्यांचे वजन दोन किलोंनी घटले आहे. तसेच बच्चू कडू यांचा बीपीही लो झाला आहे. त्यांनी तत्काळ औषधं घ्यावीत, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र कडू यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी