40 मिनिटे भाषण करु शकता, पण मग चक्कर कशी येते? शरद पवारांची पंकजा मुंडेवर टीका

मला समजत नाही तुम्ही 40 मिनिट भाषण करू शकता, मात्र त्यानंतर तुम्हाला चक्कर कशी आली?" अशी टीकाही शरद पवार यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर (Sharad Pawar on Pankaja Munde) केली. 

40 मिनिटे भाषण करु शकता, पण मग चक्कर कशी येते? शरद पवारांची पंकजा मुंडेवर टीका
Follow us
| Updated on: Oct 21, 2019 | 2:06 PM

मुंबई : राज्यभरात सर्वत्र मतदानाचा उत्साह दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सकाळी मुंबईतील मलबार हिल येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शरद पवार यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत केली. “काल मी टीव्हीवर बघत होतो, त्यावेळी त्यांनी आमच्या विरोधी पक्षनेत्यांबद्दल आरोप केले (Sharad Pawar on Pankaja Munde)  होते. त्यांनी 40 मिनिटे भाषण केलं. तो त्यांचा अधिकार आहे. पण त्यानंतर त्यांना चक्कर आली. मला समजत नाही, तुम्ही 40 मिनिट भाषण करू शकता, मात्र त्यानंतर तुम्हाला चक्कर कशी येते?” असा प्रश्न शरद पवार यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर (Sharad Pawar on Pankaja Munde) केली.

“भाषणादरम्यान धनंजय मुंडे यांनी त्यांचा उल्लेख माझ्या बहिणाबाई असा केला. तो चुकीच्या शब्दांनी केला असा आरोप त्यांनी केला. पण त्यांना महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास माहिती नाही. खानदेशामध्ये बहिणाबाई नावाच्या मोठ्या कवियत्री होऊन गेल्या. बहिणाबाईंच्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्रमध्ये नाट्य काव्यलेखन अतिशय आदर आहे. त्यांच्या कविता या मार्गदर्शन करणार्‍या अशा प्रकारचे आहेत. म्हणून बहिणाबाई हे नाव महाराष्ट्राच्या अंतकरणात बसले आहे. मग बहिणाबाई म्हटल्यानंतर काय बिघडलं,” असेही शरद पवार म्हणाले.

“यापूर्वी मला अशाप्रकारचे चित्र कधीही दिसलं नव्हतं. राज्य सरकारच्या धोरणाबद्दल लोकांनी राज्य प्रमुखांना विचारलं. सभेमध्ये तर तो लोकांचा अधिकार आहे. आम्हाला विचारतात त्याचे उत्तर देणे आपली जबाबदारी आहे. पण उत्तर देण्यासाठी आपल्याकडे काही नसलं, एक नवीन पद्धत निघाली आहे. विरोधकांनी किंवा लोकांनी प्रश्न विचारले तर लगेच, भारत माता की जय घोषणा देऊन असे वातावरण करून घोषणा द्यायच्या. यामुळे लोकांचा मूळ विषय दुसरीकडे करायचा किंवा शिवाजी महाराजांची आठवण करून द्यायचे. या सगळ्या गोष्टी हेच सांगतात की सत्ताधारी पक्षाला लोकांना सामोरे जायची अशी स्थिती नव्हती. लोकांच्या नाराजी संबंधात त्यांचे समाधान करण्याची त्यांच्याकडे शक्ती नव्हती.  लोक बदल झाला पाहिजे या विचाराचे आहेत.” अशी टीकाही शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर (Sharad Pawar on Pankaja Munde) केली.

“मला मतदानामध्ये सहभागी व्हायचा आनंद नेहमी असतो. अलीकडे गेल्या पाच वर्षात मी मुंबईत मतदान करतो आहे. माझं मतदान पूर्वी बारामतीत असायचे. आता मुंबईमध्ये मलबार हिलमध्ये आहे.” असेही ते म्हणाले.

“मलबार हिल या विभागातील लोक आरामात मतदानाला जातात. पण ज्या पद्धतीने जात आहेत. यावरुन लोक मलबार हिल हा अनुकूल आहे असे दिसते. मुंबईत ढगाळ वातावरण असलं तरी लोक सहभागी होतात. यावरुन लोक काहीतरी बदल करण्याच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. माझी खात्री आहे की परिवर्तनाची आवश्यकता आहे आणि आवश्यक त्याची पूर्तता लोक या मतदानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात करतील”, असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांना निवडणूक प्रचाराच्या उत्साहाबद्दल विचारले असता शरद पवार म्हणाले. “तुम्ही लोक पुन्हा पुन्हा मला माझ्या 80 वर्षे वयाच्या आठवण करुन देता, मी काय म्हातारा झालेला नाही. मला आठवत नाही मी किती सहभाग घेतले असतील. किती जिल्ह्यात गेलो असेल. पण सर्वत्र लोकांची भरपूर साथ आहे. रात्री दहा वाजता शेवटची बैठक संपते. त्यांनतर कोणत्याही प्रचाराला जाहीर परवानगी नसते. पण दहानंतर सुद्धा मी रात्री एक-दोन वाजेपर्यंत जागा असतो. ग्राऊंडवर एकंदर परिस्थिती समजून काही कमतरता असेल, काही लोकांना आवश्यकता असेल, तर त्या गोष्टी करत होतो. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टींना सहकार्याची साथ होती.”

“काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येईल का? किती जागा मिळतील असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता शरद पवार म्हणाले. आम्हाला किती जागा मिळतील हे आता सांगता येणार नाही पण बहुमत मिळेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी समजल्या. सत्ताधारी लोकांना पाठिंबा नाही. त्यामुळे सत्ताधारी लोकांच्या हातून सत्ता जाणार याची जाण त्यांना झालेली दिसते” असेही शरद पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.