गौप्यस्फोटाला उत्तर गौप्यस्फोटाने, फडणवीसांच्या मुलाखतीला उत्तर पवारांच्या मुलाखतीने!

संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. Sharad Pawar Interview by Sanjay Raut

गौप्यस्फोटाला उत्तर गौप्यस्फोटाने, फडणवीसांच्या मुलाखतीला उत्तर पवारांच्या मुलाखतीने!

मुंबई : शिवसेना संसदीय नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. “सत्तास्थापनेनंतरची पहिली स्फोटक मुलाखत आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवेळी झालेल्या राजकीय घडामोडींचे खळबळ निर्माण करणारे गौप्यस्फोट या मुलाखतीतून होतील” असा दावा खुद्द संजय राऊत यांनी केला आहे. (Sharad Pawar Interview by Sanjay Raut)

चीनपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अशा विविध विषयांवर शरद पवार यांनी आपली भूमिका संजय राऊत यांच्यासोबतच्या मुलाखतीत मांडली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतींनंतर, संजय राऊत यांनी सामना दैनिकासाठी पहिल्यांदाच अन्य राजकीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची घेतलेली ही पहिली मुलाखत आहे.

‘सामना’त लवकरच या मॅरेथॉन मुलाखतीचे भाग प्रसिद्ध होणार आहेत. समाजमाध्यमांवरही ऑडिओ-व्हिडीओद्वारे मुलाखत प्रक्षेपित होणार आहे.

नुकतंच काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी इनसायडरला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांबाबत अनेक गौप्यस्फोट केले होते. “आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. थेट राष्ट्रवादी म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार नाही. थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. याबाबत योग्य त्या चर्चाही झाल्या होत्या. त्यातील एका चर्चेत मी होतो. एका चर्चेत मी नव्हतो, ऐनवेळी शरद पवारांनी भूमिका बदलली,” असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीदरम्यान केला.

आता या मुलाखतीतील गौप्यस्फोटांना शरद पवार काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सध्या महाविकास आघाडीत सुरु असलेली धुसफूस, मित्रपक्षांमधील तणाव, प्रशासनातील अधिकारी वर्ग, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या मुलाखतीला विशेष महत्त्व आहे. याशिवाय अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवार यांनी या मुलाखतीत भाष्य केलं आहे का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

शरद पवार ‘मातोश्री’वर 

दरम्यान,  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेनंतर शरद पवार मातोश्रीवर जाण्याची ही दुसरी वेळ होती. पोलिसांच्या बदल्या आणि पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याचं एक कारण यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत. त्यामुळे शरद पवार यांना आज मातोश्रीवर यावं लागल्याचं सांगण्यात येत आहे.

(Sharad Pawar Interview by Sanjay Raut)

संबंधित बातम्या 

आज गौप्यस्फोट करतोय, थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, चर्चाही झाल्या, पण पवारांनी भूमिका बदलली : फडणवीस 

…. म्हणून शरद पवारांना दुसऱ्यांदा ‘मातोश्री’वर जाण्याची वेळ?  

संध्या. 6.01 वा शरद पवार मातोश्रीवर, 6.40 गृहमंत्री मातोश्रीतून बाहेर, 6.54 वा. पवारही मातोश्रीतून बाहेर 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *