…. म्हणून शरद पवारांना दुसऱ्यांदा ‘मातोश्री’वर जाण्याची वेळ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट (Sharad Pawar CM Uddhav Thackeray Meet) घेतली.

.... म्हणून शरद पवारांना दुसऱ्यांदा 'मातोश्री'वर जाण्याची वेळ?
Namrata Patil

|

Jul 06, 2020 | 8:58 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेनंतर शरद पवार मातोश्रीवर जाण्याची ही दुसरी वेळ होती. पोलिसांच्या बदल्या आणि पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याचं एक कारण यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत. त्यामुळे शरद पवार यांना मातोश्रीवर यावं लागल्याचं सांगण्यात येत आहे. (Sharad Pawar CM Uddhav Thackeray Meet)

मुंबई पोलीस दलातील बदल्या, पारनेरमधील नगरसेवकांची फोडाफोडी, सहकारी पक्षांमधील समन्वय, अधिकाऱ्यांची मर्जी आणि मर्जीतील अधिकारी अशा विविध मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत धुसफूस आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची आहे.

मुंबई पोलीस दलातील 12 उपायुक्तांची दोन जुलैला बदली करण्यात आली होती. मात्र या बदल्यांना मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालय कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, अनिल देशमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

आधी मातोश्री आता वर्षा बंगला, शरद पवार यांच्याकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची भेट

यापूर्वी 30 मे 2020 रोजी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत देखील होते. राष्ट्रपती राजवटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली होती. त्यामुळे त्या भेटीबद्दलही मोठी चर्चा झाली होती.

याआधी शरद पवार यांनी ठाकरे स्मारकावर देखील महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभाग घेत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. ही बैठक नियमित बैठक असल्याचं आणि त्यात महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आल्याचंही त्यावेळी सांगण्यात आलं. आर्थिक गोष्टींना चालना देण्याविषयी आणि लॉकडाऊनच्या पुढील टप्प्यात काय शिथिलता देता येईल, याबाबतही बैठकीत चर्चा झाली होती. (Sharad Pawar CM Uddhav Thackeray Meet)

संबंधित बातम्या : 

शरद पवार-अनिल देशमुख मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, ‘मातोश्री’वर खलबतं

शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, वादळग्रस्त कोकणाला उभं करण्यासाठी प्लॅन ठरला

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें