LIVE | शरद पवार-अनिल देशमुख मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, 'मातोश्री'वर खलबतं

राज्यातील पोलीस दलातील बदल्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अनिल देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली (Sharad Pawar-Anil Deshmukh CM Uddhav Thackeray Meet)

LIVE | शरद पवार-अनिल देशमुख मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, 'मातोश्री'वर खलबतं

मुंबई :राज्यातील पोलीस दलातील बदल्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास शरद पवार आणि अनिल देशमुख हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर पोहोचले. त्यानंतर साधारण 45 मिनिटांनी गृहमंत्री अनिल देशमुख ‘मातोश्री’वर निघाले. त्यानंतर केवळ शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांचीच चर्चा झाली. (Sharad Pawar-Anil Deshmukh CM Uddhav Thackeray Meet)

मुंबई पोलीस दलातील बदल्या, पारनेरमधील नगरसेवकांची फोडाफोडी, सहकारी पक्षांमधील समन्वय, अधिकाऱ्यांची मर्जी आणि मर्जीतील अधिकारी अशा विविध मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत धुसफूस आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची आहे.

LIVE UPDATE

शरद पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा घटनाक्रम

  • 6.54 PM – शरद पवार मातोश्रीवरुन बाहेर पडले
  • 6.48 PM – एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर
  • 6.40 PM – अनिल देशमुख ‘मातोश्री’वरुन बाहेर पडले
  • 6.30 PM – मंत्री आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड ‘मातोश्री’वरुन बाहेर पडले
  • 6.00 PM – शरद पवार आणि अनिल देशमुख ‘मातोश्री’वर पोहोचले, जितेंद्र आव्हाडही सोबत

मुंबई पोलीस दलातील 12 उपायुक्तांची दोन जुलैला बदली करण्यात आली होती. मात्र या बदल्यांना मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालय कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, अनिल देशमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

नेमकं प्रकरणं काय?

मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या मुंबईतील अंतर्गत बदल्यांना मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालय कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरुन दिली. मुंबई पोलीस दलातील 12 उपायुक्तांची दोन जुलैला बदली करण्यात आली होती. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या बदल्यांना महत्त्व होते.

डॉ. रश्मी करंदीकर, शंकर शिंदे, परमजीत सिंग दहिया, संग्रामसिंग निशाणदार, प्रशांत कदम, शहाजी उमप, मोहन दहीकर अशा 12 उपायुक्तांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने गुरुवारी काढले होते, मात्र त्याला अवघ्या तीन दिवसात स्थगिती मिळाली आहे. याचे नेमके कारण अस्पष्ट आहे. आमच्या सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंकडून टीका

“माझा जो अनुभव आहे त्या प्रमाणे पोलीस आयुक्तांच्या समितीला अंतर्गत बदलीचे अधिकार असतात. या बदल्यांबाबत आयुक्त गृहमंत्र्यांना माहिती देतात. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री स्वतंत्र असताना गृहमंत्री या बदल्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना देतात. यानंतर या बदल्या होतात. मात्र, या प्रकरणात आयुक्तांनी आणि गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना या बदल्यांची माहिती दिलीच नाही. नंतर हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी या बदल्यांना स्थगिती दिली.” असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

मुंबई पोलीस दलातील 12 उपायुक्तांची दोन जुलैला बदली करण्यात आली होती. मात्र या बदल्यांना मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालय कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे, यावरुनही नारायण राणेंनी सरकारवर टीका केली. “बदली प्रकरणावर मात्र तात्काळ बैठका होतात. झालेल्या बदल्या तात्काळ रद्द होतात. या बदल्यांमागे कोणाचं काय सुरु आहे. कोणाला काय फायदा आहे हे जनेतला कळतयं,” असे नारायण राणे म्हणाले. (Sharad Pawar-Anil Deshmukh CM Uddhav Thackeray Meet)

संबंधित बातम्या : 

मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या 12 उपायुक्तांच्या बदल्यांना गृहमंत्र्यांची तीन दिवसात स्थगिती

पोलीस दलातील बदल्यांची मुख्यमंत्र्यांना माहितीच नाही, सरकारमध्ये कुरघोडीचे प्रयत्न : देवेंद्र फडणवीस

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *