शरद पवारांनी घेतली शशिकांत शिंदेंची भेट; जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालांवर बंद दाराआड चर्चा

सातारा जिल्हा बँकेचे निकाल नुकतेच लागले या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांची भेट घेतली.

शरद पवारांनी घेतली शशिकांत शिंदेंची भेट; जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालांवर बंद दाराआड चर्चा
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 6:51 AM

सातारा : जिल्हा बँकेचे निकाल नुकतेच लागले या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहामध्ये खासदार श्रीनिवास पाटील सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली.

पराभवाचा वचवा काढणार

या चर्चेनंतर आमदार शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीबाबत शरद पवार यांनी माहिती घेतली असल्याचे ते म्हणाले. याबरोबरच पराभवाचा वचपा काढण्यासाठी सातारा आणि जावळी या ठिकाणी लक्ष केंद्रीत करणार असून, सातारा नगरपालिकेची निवडणूक एक हाती जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त  केला आहे.

शशिकांत शिंदेंचा निसटता पराभव

दरम्यान जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने निसटता पराभव झाला, तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. पाटण विकास सेवा सोसायटी गटात सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर विजयी झाले असून त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी राहिलेले  शिवसेना उमेदवार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले असून, त्यांनी विलासकाका उंडाळकर यांचे काँग्रेसवासी पुत्र उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव केला.

संबंधित बातम्या

34 वर्षांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये, नागपूर विधानपरिषदेसाठी बावनकुळेंविरोधात छोटू भोयर

आव्हाड म्हणाले मुझफ्फर हुसेन यांची सल्तनत संपवयाची आहे; बंटी माझे काहीही बिघडू शकणार नाही, हुसेन यांचे प्रत्युत्तर

MLC election : काँग्रेसकडून विधान परिषदेच्या ‘या’ दोन जागांसाठी उमेदवार जाहीर

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.