AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आव्हाड म्हणाले मुझफ्फर हुसेन यांची सल्तनत संपवयाची आहे; बंटी माझे काहीही बिघडू शकणार नाही, हुसेन यांचे प्रत्युत्तर

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि काँग्रेसचे स्थानिक नेते मुझफ्फर हुसेन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आम्हाला एकीकडे नरेंद्र मेहता आणि दुसरीकडे सुलतान ए आजम सुलतान ए नया नगर यांची सल्तनत संपवयाची आहे, असे आव्हाड यांनी म्हटले.

आव्हाड म्हणाले मुझफ्फर हुसेन यांची सल्तनत संपवयाची आहे; बंटी माझे काहीही बिघडू शकणार नाही, हुसेन यांचे प्रत्युत्तर
जितेंद्र आव्हाड
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 7:26 AM
Share

मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि काँग्रेसचे स्थानिक नेते मुझफ्फर हुसेन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आम्हाला एकीकडे नरेंद्र मेहता आणि दुसरीकडे सुलतान ए आजम सुलतान ए नया नगर यांची सल्तनत संपवयाची आहे, असे आव्हाड यांनी म्हटले. ते मिरा-भाईंदरमध्ये अल्पसंख्यांक विभागाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

आव्हाडांच्या टीकेला प्रत्युत्तर 

दरम्यान आव्हाड यांच्या या टीकेला मुझफ्फर हुसेन यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सोमवारी राष्ट्रवादीची सभा झाली या सभेत मला त्यांनी  सुलतान ए आजमची उपाधी दिली. तसेच त्यांनी माझी सल्तनत संपवायची आहे, असेही म्हटले असल्याचे मला अनेक पत्रकारांनी सांगितले. मी आव्हाड यांना सांगू इच्छितो की या देशात नाही तर जगात एकच सुलताने हिंद आहेत, ते म्हणजे हजरत ख्वाजा गरीब नवाज रहमुदुल्ला आले. त्यांचा आर्शीवाद माझ्यावर आहे. त्यामुळे आव्हाडांसारखे बंटी बबली माझे काहीही बिघडू शकणार नाहीत.

अल्पसंख्याक  विभागाच्या कार्यालयाचे उद्घाटन

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड याच्या हस्ते मिरा-भाईंदरमध्ये राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक  विभागाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मिरा भाईंदर शहर यांच्या वतीने शहरात हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी चौफेर टीका केली. मात्र मुझफ्फर हुसेन यांच्यावक केलेली टीका आणि हुसेन यांनी आव्हाडांना दिलेले प्रत्युत्तर हा चर्चेचा विषय बनला.

संबंधित बातम्या 

धक्कादायक: रस्त्यावरील खड्ड्यामुळे हादरे बसल्याने रायफलमधून सुटली गोळी, हिंगोलीत जवानाचा मृत्यू!

बीडच्या कैद्याचा कारनामा! कारागृहातून 5 देशांतील लोकांना कोट्यवधींचा गंडा, मोठे हवाला रॅकेट उघड होण्याची शक्यता!

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...