बीडच्या कैद्याचा कारनामा! कारागृहातून 5 देशांतील लोकांना कोट्यवधींचा गंडा, मोठे हवाला रॅकेट उघड होण्याची शक्यता!

बीडच्या कैद्याचा कारनामा! कारागृहातून 5 देशांतील लोकांना कोट्यवधींचा गंडा, मोठे हवाला रॅकेट उघड होण्याची शक्यता!
बीडच्या कैद्याने मध्य प्रदेश कारागृहातून अनेकांना कोट्यवमधींचा गंडा घातल्याचे उघड

बीडच्या हॅकर तरुणाने मध्य प्रदेश कारागृहात शिक्षा भोगत असतानाच अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. कारागृह प्रशासनानेही यासाठी त्याला सहकार्य केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Nov 22, 2021 | 12:11 PM

बीड: मूळचा बीड येथील रहिवासी असलेला तरुण एका गुन्ह्याखाली (Beed Hacker) मध्य प्रदेशातील कारागृहात (MP Jail) शिक्षा भोगत आहे. मात्र कारागृहातूनच त्याने विविध देशांतील लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, कारागृह प्रशासनातील दोन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्याकडून जबरदस्तीने काम करवून घेतल्या आरोप या गुन्हेगाराने पोलिसांकडे दिलेल्या जबाबात नोंदवला आहे. विशेष म्हणजे हवालाच्या माध्यमातून फसवणुकीचे पैसे वळवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून अनेकांची चौकशी सुरु आहे. मध्यप्रदेश सायबर पोलीस (Cyber police) सध्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

हॅकर तरुण 2018 पासून म.प्र.च्या कारागृहात

बीड येथील रहिवासी असलेला अमर अनंत अग्रवाल हा तरुण फेब्रुवारी 2018 पासून फसवणुकीच्या प्रकरणात भैरवगड कारागृहात बंदी होता. हॅकर असल्यामुळे कारागृहातील अधिकाऱ्यांनी त्याला लॅपटॉप आणि काही क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले. त्याद्वारे त्याने अनेकांची खाती हॅक करून पैशांची अफरातफर केली. अनेक पंचचारांकित हॉटेलांनाही त्याने अशा प्रकारे गंडा घातला.

कारागृह अधिकाऱ्यांचीही चौकशी

अधिक चौकशी केली असता या गुन्हेगाराने पाच देशांतील हॉटेल, नागरिक तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अमरच्या आरोपानंतर आता तत्कालीन कारागृह अधीक्षक संतोष लडिया, सहाय्यक कारागृह अधीक्षक सुरेश गोयल व काही कर्मचाऱ्यांची मध्य प्रदेश सायबर सेलकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. अमरला आता भोपाळच्या कारागृहात हलवण्यात आले आहे.

मोठे हवाला रॅकेट उघड होण्याची शक्यता

अमर अग्रवाल याने ऑनलाइन गंडा घालून हे पैसे हवालाच्या माध्यमातून फिरवले. यात काही पैसे संबंधित जेलच्या अधिकाऱ्यांना मिळाले तर काही अमरने स्वतः फिरवले आहेत. बीडमध्येही हवालाचे पैसे आल्याचा पोलिसांना संशय आहे. या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे. या प्रकरणी पुण्यातील दोघांचीही चौकशी करण्यात आली आहे.

इतर बातम्या-

लसीकरणाचे नियम डावलले, औरंगाबादमध्ये बाबा पेट्रोल पंप सील, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

अनिल परबांना केबल कनेक्शन देण्याइतकं एसटीचं काम सोप्पं वाटतं का?; राधाकृष्ण विखे-पाटलांची खोचक टीका


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें