दिल्या घरी सुखी राहा! उस्मानाबादच्या पाटील कुटुंबाला आता राष्ट्रवादीत नो एन्ट्री, शरद पवारांकडून स्पष्ट

उस्मानाबादमधील दिग्गज नेते पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांना आता राष्ट्रवादीची दारं कायमस्वरुपी बंद असल्याचं पवारांनी त्यांचं नाव न घेता स्पष्ट केलं.

दिल्या घरी सुखी राहा! उस्मानाबादच्या पाटील कुटुंबाला आता राष्ट्रवादीत नो एन्ट्री, शरद पवारांकडून स्पष्ट


उस्मानाबाद: विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना घरवापसीसाठी काही निकष आहेत. पण उस्मानाबाद जिल्ह्यातील नेत्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसची दारं बंद असल्याचं खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीदरम्यान पवारांचे निकटवर्तीय आणि नातेवाईक असलेल्या माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यासंदर्भात बोलताना दिल्या घरी सुखी राहा, अशा शब्दात पवारांनी पाटील कुटुंबाला आता राष्ट्रवादीत एन्ट्री नसल्याच स्पष्ट केलं. (Sharad Pawar on Padmasingh Patil and Rana jagjeetsingh Patil NCP no entry)

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी उस्मानाबादच्या पाटील परिवाराबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. राज्यातील अनेक नेते जे राष्ट्रवादीसोडून गेले, ते परत राष्ट्रवादीत येऊ इच्छित असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न विचारण्यात आला असता पवार यांनी काही भागातील नेत्यांबाबत पक्षानं निर्णय घेतला आहेत. त्यात उस्मानाबादच्या नेत्यांचं नाव न घेता त्यांना आता राष्ट्रवादीत एन्ट्री नसल्याचं पवारांनी जाहीर केलं.

यापूर्वी शरद पवार यांना जवळच्या नात्यातील लोक पक्ष सोडून जात असल्याबाबत एका पत्राकाराने प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना पवार चांगलेच भडकले होते.  अहमदनगरच्या श्रीरामपूर इथं पत्रकार परिषदेत बोलताना नेते पक्ष सोडून जात आहेत, कार्यकर्ते नाही, असं पवार म्हणाले. त्यावर एका पत्रकाराने आपले नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटील पक्ष सोडत असल्याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा नातेवाईक आणि राजकारण याचा संबंध नाही, असं म्हणत पवार चांगलेत संतापले होते.

पवार आणि उस्मानाबादच्या पाटील परिवाराचे नाते

उस्मानाबादचे नेते पद्मसिंह पाटील हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पवारांसोबत होते. शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून आजवर त्यांची ओळख होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळं पवार आणि पाटील यांच्यात एक मोठी दरी निर्माण झाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखाने लवकर सुरु व्हायला हवे- पवार

चांगला पाऊस झाल्यानं उस्मानाबाद जिल्ह्यातील उसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत तेरणा सारखा मोठा कारखाना सुरु करणं शक्य नाही. मात्र, तुळजाभवानीसारखे कारखाने सुरु झाले पाहिजेत. त्यासंदर्भात आपण राज्य सरकार आणि सहकार खात्याशी चर्चा करणार असल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली.

संबंधित बातम्या:

खडसेंची भाजपने दखल घेतली नाही; राजकीय निर्णय काय घ्यावा तो त्यांचा प्रश्न: पवार

गप्प बसवत नाही म्हणून मी सर्वात आधी येतो! संकटकाळातील दौऱ्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवारांचं मिश्किल उत्तर

Sharad Pawar on Padmasingh Patil and Rana jagjeetsingh Patil NCP no entry

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI