शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलं, गडकरींच्या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखेंची दांडी

तत्पूर्वी गडकरी आणि शरद पवार यांची पुणे विमानतळावर भेट झाली. दोघांमध्ये विकासकामांच्या संदर्भाने जवळपास अर्धा तास चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेते नगरकडे एकाच हेलिकॉप्टरने रवाना झाले. पुढच्या 40 मिनिटांमध्ये ते नगरमध्ये पोहोचतील. त्यांच्या स्वागताला राधाकृष्ण विखे पाटील सज्ज आहेत.

शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलं, गडकरींच्या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखेंची दांडी
नगरमधल्या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील यांची गैरहजेरी
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 11:40 AM

अहमदनगर : नगरमधल्या कार्यक्रमासाठी आज राधाकृष्ण विखे पाटील आणि शरद पवार एकत्र येणार होते. साथीला गडकरी देखील होते. पण या महत्त्वाच्या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील यांनी दांडी मारली आहे. त्यांनी पवारांसोबत एकाच मंचावर हजेरी लावण्याचं टाळलं आहे. नगरमध्ये कार्यक्रम होत असल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांची हजेरी अपेक्षित होती. पण ऐनवेळी दांडी मारुन त्यांनी पवारांसोबत स्टेज शेअर टाळलं.

राधाकृष्ण विखेंची कार्यक्रमाला दांडी

शरद पवार आणि नितीन गडकरी यांनी एकाच हेलिकॉप्टरमधून पुणे ते नगर हवाईप्रवास केला. सकाळी पावणे अकराच्या सुमारास ते नगरमध्ये दाखल झाले. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सपुत्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. पण यादरम्यान राधाकृष्ण विखेंची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. त्यांच्या गैरहजेरीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

सुजय विखेंकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांचं जंगी स्वागत

तत्पूर्वी गडकरी आणि शरद पवार यांची पुणे विमानतळावर भेट झाली. दोघांमध्ये विकासकामांच्या संदर्भाने जवळपास अर्धा तास चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेते नगरकडे एकाच हेलिकॉप्टरने रवाना झाले. पवार गडकरींचं हेलिकॉप्टर विखेंच्याच हेलिपॅडवर लँड झालं.  शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागताला नगरमधील सगळे राजकीय नेते हेलिपॅडवर जमले होते. त्यावेळी सुजय विखे यांनी नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले तर आमदार रोहित पवार यांना हँडशेक करुन त्यांची खुशाली विचारली.

राजकीय फटकेबाजीकडे लक्ष

राजकीय भेद विसरुन पवार-सुजय विखे-गडकरी विकासकामांसाठी एकाच मंचावर आले. एरव्ही देखील पवार-गडकरी एकत्र आल्यानंतर राजकीय फटकेबाजी पाहायला मिळते. आजही अशीच राजकारणापलीकडची फटकेबाजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटी लोकार्पण सोहळा होत आहे. याच सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवार, नितीन गडकरी आणि विखे परिवार एकाच मंचावर येणार आहे. आज 10.45 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाकडे नगरचंच नव्हे तर राज्याचं लक्ष लागलं आहे.

नगर परिसरातील कोणकोणत्या विकासकामांचं भूमीपूजन?

नगर-करमाळा-टेंभुर्णी या चौपदरी रस्त्यासाठी मोठा निधी, सावळीविहीर ते अहमदनगर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ४९६ कोटी, अहमदनगर- भिंगार या १८ किलोमीटर रस्तारुंदीकरणासाठी ३५ कोटी रुपये, तर राष्ट्रीय राखीव निधीमधील कामांसाठी ८४ कोटी रुपये खर्च होत आहे.

या कामांचे भूमिपूजन होणार आहे. अहमदनगर-दौड-वासुंदे फाटा रस्ता मजबुतीकरण, अहमदनगर-कडा-आष्टी-जामखेड रस्ता मजबुतीकरण, नांदूर शिंगोटे ते कोल्हार रस्ता मजबुतीकरण व कोपरगाव-वैजापूर रस्ता मजबुतीकरणाची कामे पूर्ण झाली असून, त्यांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. केडगावजवळील सोनेवाडी रस्त्यावरील श्रेया गार्डन येथे मुख्य कार्यक्रम होत आहे.

लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध विखे संघर्ष

शरद पवार आणि विखे पाटील घराण्यातील वाद जुना आहे. मात्र हा वाद आताच्या पिढीमध्येही आल्याचं दिसून आलं. लोकसभा निवडणुकीवेळी नगरची जागा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादीने म्हणजे शरद पवारांनी नकार दिला होता. मात्र या जागेसाठी सुजय विखे पाटील यांनी आग्रह धरला होता. आघाडीत बिघाडी झाली तरी चालेल, पण नगर दक्षिणची जागा काँग्रेससाठी सोडणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता. त्यामुळे राष्ट्रवादीने जागा न सोडल्यामुळे सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन निवडणूक लढवली. सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा पराभव केला होता. त्यावेळी पवार आणि विखे घराण्यातील टोकाचा संघर्ष दिसला होता.

काय आहे विखे वि. पवार वाद?

शरद पवार आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यात अनेक वर्षांपासून संघर्ष चालत आला होता. त्यांच्यात दोन गट होते. पण 1991 च्या लोकसभा निवडणुकीत हा वाद खऱ्या अर्थाने पेटला. या निवडणुकीत नगर दक्षिणची जागा बाळासाहेब विखेंना टाळून काँग्रेसने यशवंतराव गडाख यांना दिली होती. अर्थात शरद पवारांनीच ही जागा गडाखांना मिळावी यासाठी जोर लावल्याचं बोललं जातं. बाळासाहेब विखे पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढले. या निवडणुकीत बाळासाहेब विखेंचा पराभव झाला. पण स्वतःच्याच जिल्ह्यात झालेला हा पराभव बाळासाहेब विखेंच्या जिव्हारी लागला होता.

बाळासाहेब विखेंनी आचारसंहितेचा धागा पकडत विजयी उमेदवार यशवंतराव गडाख यांच्याविरोधात तक्रार केली. या निवडणुकीत जात आणि धर्माच्या आधारावर मतं मागितली गेल्याचा त्यांनी आरोप केला. बाळासाहेब विखेंनी या प्रकरणी पुरावे जमा केले, प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि आरोपी होते यशवंतराव गडाख, तर सहआरोपी म्हणून शरद पवारांचं नाव होतं. शरद पवार या प्रकरणातून यशस्वीरित्या बाहेरही पडले होते.

पुढच्या पिढीतही वाद चालूच

बाळासाहेब विखे आणि शरद पवार यांच्यातला वाद उभ्या महाराष्ट्राला परिचित असला तरी हा वाद मात्र दुसऱ्या पिढीतही सुरु आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातही फार सौख्य नाही. सुजयला नातू समजून पवारांनी जागा सोडावी, असं विखे पाटील म्हणाले होते. पण ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

पुन्हा एकदा 1991 सारखी लढत?

नगर दक्षिणेत राष्ट्रवादीकडून प्रशांत गडाख यांच्या नावाची चर्चा होती. शरद पवारांनी गडाख अस्त्र बाहेर काढल्याची चर्चा होती. जर प्रशांत गडाख यांना उमेदवारी मिळाली, तर विखे विरुद्ध गडाख लढाईची पुनरावृत्ती पाहायला मिळू शकणार होती. कारण यशवंतराव गडाखांनी स्वर्गीय बाळासाहेब विखेंचा पराभव केला होता. 1991- च्या लोकसभा निवडणुकीत विखे गडाख खटला देशभरात गाजला होता. हा वाद प्रत्येक राजकारणात पाहायला मिळाला. त्यानंतर शरद पवार आणि विखे पाटील घराण्यात हा वाद आला. जर सुजय विखेंनी इथे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आणि राष्ट्रवादीने प्रशांत गडाख यांना उमेदवारी दिली तर हा वाद आणखी ताणण्याची शक्यता होती. पण राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली. अखेर लोकसभेला सुजय विखे यांनी संग्राम जगताप यांचा पराभव केला होता.

(Sharad Pawar Radhakrishna Vikhe patil And Nitin gadkari Share dias In Maharashtra nagar over Inauguration of development Works Live Updates)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.