माझ्या वक्तव्याचा विपर्यास, मतदानानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबई: स्थिर सरकार येणं आवश्यक आहे.  आजचा दिवस देशासाठी महत्वाचा आहे. मुंबईकर महत्वाच्या दिवशी मोठ्या संख्येने मतदान हक्क बाजावतील. मुंबईतील मतदान टक्केवारीबाबत काळजी वाटते,  पण मुंबई मागे राहणार नाही, अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. माझ्या वक्तव्याचा विपर्यास शरद पवार यांनी नुकतंच एका मुलाखतीत एनडीएला बहुमत न मिळाल्यास, मायावती, ममता बॅनर्जी […]

माझ्या वक्तव्याचा विपर्यास, मतदानानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

मुंबई: स्थिर सरकार येणं आवश्यक आहे.  आजचा दिवस देशासाठी महत्वाचा आहे. मुंबईकर महत्वाच्या दिवशी मोठ्या संख्येने मतदान हक्क बाजावतील. मुंबईतील मतदान टक्केवारीबाबत काळजी वाटते,  पण मुंबई मागे राहणार नाही, अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास

शरद पवार यांनी नुकतंच एका मुलाखतीत एनडीएला बहुमत न मिळाल्यास, मायावती, ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबू नायडू पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार आहेत, असं वक्तव्य केलं होतं. त्याबाबत शरद पवार म्हणाले, “माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, मला विचारलं राहुल गांधीशिवाय इतर कोण पर्याय आहे, तर त्यावर मी म्हटलं की मायावती, ममता, चंद्राबाबू नायडू अशी नावं आहेत. ज्यांनी मुलाखत छापली त्यांची अपरिपक्तवता आहे, असंही शरद पवारांनी नमूद केलं.

मला सगळ्या निवडणुका महत्वाच्या वाटतात. मावळ काय बारामती काय मुंबई काय, लोक निर्णयाक निर्णय घेतील, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले होते?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीएला यावेळी लोकसभा निवडणुकांमध्ये बहुमत मिळणं अत्यंत कठीण आहे. जर एनडीएला बहुमत मिळालं नाही, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख तसेच उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे तीन जण मला पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार वाटतात”, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. विशेष म्हणजे शरद पवारांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना यातून वगळलं. संपूर्ण बातमी –  पवारांच्या मते पंतप्रधानपदासाठी ‘हे’ तिघे जण प्रबळ दावेदार

शरद पवारांचं मतदान

दरम्यान, शरद पवारांनी आज मुंबईतील पेडर रोड इथं नात रेवती, जावई सदानंद सुळे यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला.

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात आज महाराष्ट्रातील 17 मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये मुंबईतील 6, ठाण्यातील 4, मावळ, शिरुर आणि उत्तर महाराष्ट्रातील 5 मतदारसंघाचा समावेश आहे.

नंदुरबार (अ.ज.), धुळे, दिंडोरी (अ.ज.),नाशिक, पालघर (अ.ज.), भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण,मावळ, शिरुर आणि शिर्डी (अ.जा.) या लोकसभा मतदारसंघत मतदान होत आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.