तीन पक्षांमध्ये मतभेद नाहीत, सरकार पाच वर्ष टिकणार, शरद पवारांना विश्वास

कुठल्याही महत्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी यंत्रणेतील सहा सहकारी एकत्र बसतात आणि त्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळे हे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे, असं पवार म्हणाले.

तीन पक्षांमध्ये मतभेद नाहीत, सरकार पाच वर्ष टिकणार, शरद पवारांना विश्वास
Sharad Pawar
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 1:20 PM

बारामती : “महाविकास आघाडी सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. सरकार पाच वर्ष टिकेल याबद्दल शंका नाही” असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला. आम्हा सर्व पक्षांमध्ये सामंजस्य आहे, यात कुठलेही मतभेद नाहीत, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. ते बारामतीमध्ये बोलत होते. (Sharad Pawar says Maha Vikas Aghadi will last 5 years)

“धोरणात्मक प्रश्नांवर यंत्रणेतील सहकाऱ्यांची एकत्र चर्चा”

महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना आम्ही काही मुद्यांवर एकत्र आलो. सरकार चालवताना काही प्रश्न निर्माण होत असतात. त्यावर मार्ग काढण्यासाठी यंत्रणा असावी अशी चर्चा झाली. या यंत्रणेत तिन्ही पक्षाचे नेते घेण्यात आले, असं शरद पवारांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे समन्वय साधण्याचं काम करतात, असं पवारांनी सांगितलं.

कुठल्याही महत्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी यंत्रणेतील सहा सहकारी एकत्र बसतात आणि त्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळे हे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. त्यातूनच हे सरकार पाच वर्षे टिकेल याबद्दल शंका नाही, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

“कुठलेही मतभेद नाहीत”

दरम्यान, तिन्ही पक्षांची सरकारमधील भूमिका हा एक भाग आहे, तर राजकीय पक्ष म्हणून संघटनेचं काम वाढवणं ही दुसरी बाजू आहे. राजकीय पक्षाला संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणं हे स्वाभाविक आहे. हा प्रयत्न करण्यासंदर्भात आमच्या सर्व पक्षांचं सामंजस्य आहे. यात कुठलेही मतभेद नाहीत, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावरील प्रश्नाला उत्तर देताना दिली.

आरबीआयच्या निर्णयावर भाष्य

दुसरीकडे, नगरसेवक, आमदार, खासदार यांना सहकारी बँकांचे कार्यकारी संचालक होता येणार नाही, किंवा पूर्णवेळ संचालक देखील होता येणार नाही, अशी नवीन नियमावली आरबीआयकडून लागू करण्यात आली आहे. त्यावर बोलताना “आरबीआय ही अर्थकारणावर आणि संबंधित संस्थांवर नियंत्रण असणारी संस्था आहे. धोरणात्मक निर्णय घेतला असेल तर त्याची माहिती घ्यावी लागेल. परंतु त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर तो स्वीकारावाच लागेल” असं शरद पवार म्हणाले.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

काँग्रेसशिवाय पर्यायी शक्ती अशक्य, तिसऱ्या आघाडीच्या चर्चेबाबत शरद पवारांचं स्पष्टीकरण

आघाडीचं नेतृत्व करणार का, शरद पवार हसत म्हणाले, फार वर्षे पवारांनी असे उद्योग केलेत!

(Sharad Pawar says Maha Vikas Aghadi will last 5 years)

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.