Sushant Death Case | मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास, पण सीबीआय चौकशीला विरोध नाही, पवारांची भूमिका

"ठाकरे परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय का?" असा प्रश्न विचारला असता "यामागे काय हेतू मला सांगता येत नाही" असे शरद पवार म्हणाले.

Sushant Death Case | मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास, पण सीबीआय चौकशीला विरोध नाही, पवारांची भूमिका

मुंबई : माझा महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मात्र सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करायची असेल, तर मी विरोध करणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. (Sharad Pawar says wont oppose CBI enquiry in Sushant Singh Rajput Death Case)

“मी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांना 50 वर्ष ओळखतो. माझा पूर्ण विश्वास आहे. कुणी काय आरोप केले, याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. माझ्यासाठी हा विषय तितका महत्त्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली, तर निश्चितच दु:ख होतं, पण याची चर्चा ज्या पद्धतीने होते, मला त्याबद्दल आश्चर्य वाटतं” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

“परवाच मी साताऱ्यात होतो. एका शेतकऱ्याने माझा हात धरला आणि विचारलं एका कलाकाराने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे, ते व्हायला नको होतं, पण ज्याची चर्चा मीडियात होते त्याचं आश्चर्य वाटतं. त्याने सांगितलं माझ्या भागात 20 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्याची मीडियात नोंदही नाही. त्यावरुन सर्वसामान्यांची भावना माझ्या लक्षात आली.” असे पवार म्हणाले.

“माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. चौकशी करायची असेल, सीबीआय किंवा कोणतीही एजन्सी वापरायची असेल, तर मी विरोध करणार नाही.” अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

“ठाकरे परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय का?” असा प्रश्न विचारला असता “यामागे काय हेतू मला सांगता येत नाही” असे शरद पवार म्हणाले.

पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्याप्रकरणी शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. “माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआयबाबत जे बोलले आहेत तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही” असे पवार म्हणाले.

(Sharad Pawar says wont oppose CBI enquiry in Sushant Singh Rajput Death Case)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *