AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वार्थासाठी महाराज दिल्लीच्या अधीन झाले नव्हते, पवारांचा उदयनराजेंना टोला

शरद पवार यांनी नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या मेळाव्यात गयाराम नेत्यांचा समाचार घेतला. उदयनराजे भोसले यांच्यावरही नाव न घेता पवारांनी टीका केली.

स्वार्थासाठी महाराज दिल्लीच्या अधीन झाले नव्हते, पवारांचा उदयनराजेंना टोला
| Updated on: Sep 16, 2019 | 8:30 AM
Share

नवी मुंबई : राष्ट्रवादीला सोडून सत्ताधाऱ्यांची वाट धरणाऱ्या गयाराम नेत्यांवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Udayanraje) चांगलेच संतापले. स्वार्थासाठी महाराज दिल्लीच्या अधीन झाले नव्हते, अशा शब्दात पवारांनी नाव न घेता साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना (Sharad Pawar on Udayanraje) टोला लगावला.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला भगदाड पडलं आहे. खुद्द शरद पवार यांच्या वर्तुळातील दिग्गज नेत्यांसह आमदार-खासदार भाजपची वाट धरत आहेत. याच पार्श्वभूमीवर, नवी मुंबईतील जिल्हा मेळाव्यात शरद पवारांनी गयारामांवर निशाणा साधला. स्वार्थासाठी महाराज दिल्लीच्या अधीन झाले नव्हते, असं म्हणत शरद पवार यांनी उदयनराजेंना चपराक (Sharad Pawar on Udayanraje) लगावली.

ज्या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी वाढली, त्या पक्षामध्ये काही लोक सत्तेसाठी जात आहेत. जे सोडून गेले त्यांची चिंता करण्याची गरज नाही. कुणाच्या जाण्याने महाराष्ट्राला फरक पडणार नाही, असं म्हणत पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नवा जोश देण्याचा प्रयत्न केला.

याआधी, शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीही उदयनराजेंवर शरसंधान साधलं होतं. ‘पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोदी साहेबांच्या उपस्थितीत होणार असल्याचं सांगण्यात येतं, पण तो कार्यक्रम एका नेत्याच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या लॉनमध्ये आयोजित केला जातो. भारतीय जनता पक्षाला मला एकच सांगायचं आहे, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून व्यक्तीहून अधिक त्या उपाधीचा आम्ही मान ठेवला आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश करुन ‘छत्रपती’ उपाधीचा तरी मान ठेवायचा’ अशी टीका रोहित पवार यांनी केली होती.

जुलमी सत्तेच्या विरोधात केलं जातं ते बंड असतं, पण सत्तेच्या गोटात जाण्यासाठी होते ती फक्त फितुरी असते. स्वातंत्र्यानंतर सर्व संस्थानं खालसा झाली असून आता कोणीही राजे नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही उदयनराजेंचा समाचार घेतला होता.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही उदयनराजेंच्या पक्षांतरावर आगपाखड केली होती. उदयनराजेंच्या आचरट बालिश चाळ्यांना पाठीशी घालून जवळच्या माणसांना दुखावलं, काय मिळालं? असा उद्विग्न सवाल जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना विचारला होता.

संबंधित बातम्या :

स्वातंत्र्यानंतर संस्थानं खालसा, आता कोणी राजे नाहीत, अमोल कोल्हेंची उदयनराजेंवर तोफ

पंतप्रधानांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश करुन ‘छत्रपती’ उपाधीचा तरी मान ठेवायचा : रोहित पवार

मोदी-शाह शिवरायांच्या विचाराने कार्यरत : उदयनराजे

उदयनराजेंविरुद्ध आघाडीचा एक्का बाहेर, पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी?

साहेब, उदयनराजेंच्या आचरट बालिश चाळयांना पाठिशी घातलंत, काय मिळालं? : जितेंद्र आव्हाड

भाजप प्रवेशाआधी रात्री सव्वा वाजता उदयनराजेंचा राजीनामा

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.