AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साहेब, उदयनराजेंच्या आचरट बालिश चाळयांना पाठिशी घातलंत, काय मिळालं? : जितेंद्र आव्हाड

उदयनराजेंच्या या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी टीकास्त्र सोडलं.

साहेब, उदयनराजेंच्या आचरट बालिश चाळयांना पाठिशी घातलंत, काय मिळालं? : जितेंद्र आव्हाड
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 14, 2019 | 9:57 AM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale BJP) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप अध्यक्ष अमित शाह, जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale BJP) भाजपमध्ये डेरेदाखल झाले.  मात्र उदयनराजेंच्या या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी टीकास्त्र सोडलं.

उदयनराजेंच्या आचरट बालिश चाळ्यांना पाठिशी घालून जवळच्या माणसांना दुखावलं, काय मिळालं? असा उद्विग्न  सवाल जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना विचारला. उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश करताच, जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करुन टीकास्त्र सोडलं.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“साहेब उदयनराजेंवर तुम्ही मानापासून प्रेम केले, सातारातल्या आपल्या जवळच्यांना दुखावलत. त्यांच्या सगळ्या आचरट बालिश चाळयांना पाठिशी घातलंत. पोटच्या पोरावानी प्रेम केलेत. खरा तर तुमचा स्वभाव तसा नाही. साहेब काय मिळाले? पण तरीही “यशवंतरावांचा सातारा जिल्हा शरद पवारांचा बालेकिल्ला” असं टिव्ट जितेंद्र आव्हाड यांनी केले.

मोदी-शाहा शिवरायांच्या विचाराने कार्यरत – उदयनराजे

दरम्यान, या प्रवेशानंतर उदयनराजेंनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं कौतुक केलं. काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचं धाडस मोदींनी दाखवलं. माझ्या लहानपणापासून काश्मीरप्रश्नबद्दल ऐकत होतो, पण कोणीही त्यावर उत्तर शोधत नव्हतं. पण मोदींनी ते धाडस दाखवलं, असं उदयनराजे म्हणाले. मोदी-शाहा शिवरायांच्या विचाराने कार्य करत असल्याचंही उदयनराजेंनी नमूद केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला सर्वधर्म समभावाचा विचार दिला होता. तो आदर्श लोकशाहीसारखा होता. त्यांचं जसं अष्टमंडळ होतं, त्याचाच आधार घेऊन भारतात लोकशाही प्रक्रिया सुरु आहे. या लोकशाहीला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी आणि शाह यांच्या नेतृत्वात भाजप करत आहे.

भाजप छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना पुढे घेऊन जात आहे. प्रत्येक राज्यात भाजप वाढत आहे. अनेक लोक भाजपशी जोडले जाण्यास इच्छुक आहे. त्यामागे हेच कारण आहे. लहानपणापासून काश्मीरचा विषय होता. मात्र, कुणीही त्याकडं लक्ष दिलं नाही. संपूर्ण देश एक राहावा, भारत मजबूत व्हावा म्हणून मोदींनी महत्त्वाची पाऊलं उचलली. ते निर्णय योग्य आहेत – उदयनराजे भोसले

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं