शर्मिला ठाकरे कोणत्याही पदावर नाहीत; नितेश राणेंचे त्या विधानावर सडेतोड उत्तर
शर्मिला ठाकरे यांनी नुकताच पक्ष फोडण्यापेक्षा भाजपनं स्वत:ची मुलं मोठी करावीत असे स्पष्ट मत मांडले होते. त्यावर भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकेर यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पक्षफुटी आणि बंडखोरी यावर मोठं विधान केलं आहे. त्यांनी थेट भाजपाला लक्ष्य केलं आहे. भाजपाने स्वत:ची मुलं मोठी करावीत, अशी थेट टीका त्यांनी केली आहे. अन्य पक्षातील नेत्यांना पक्षात घेण्यापेक्षा स्वत:च्या पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असे शर्मिला ठाकरे यांच्या बोलण्याचा आशय होता. दरम्यान शर्मिला ठाकरे यांनी थेट भाजपाला लक्ष्य केल्याने भाजपाच्या काही नेत्यांनीदेखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपाचे नेते तथा मंत्री नितेश राणे यांना शर्मिला ठाकरे यांच्या विधानावर आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी शर्मिला ठाकरे यांच्यावर थेट टीका करण्याचे टाळले आहे. परंतु शर्मिला ठाकरे या कोणत्याही राजकीय पदावर नाहीत, हे सांगायलाही नितेश राणे विसरले नाहीत.
काय म्हणाले नितेश राणे?
नितेश राणे एका कार्यक्रमामध्ये बोलताना आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी, शर्मिला वहिनींच्या बाबतीमध्ये तुम्ही प्रश्न विचाराल आम्ही उत्तर देऊ. ते त्यांनी स्वत:चे मत तिथे व्यक्त केले आहे. त्या राजकारणाच्या कोणत्याही पदावर नाहीत. कृपया काही लोकांना तुम्ही तुमच्या चौकटीच्या बाहेर ठेवा. विनंती आहे असे म्हटले आहे.
काय म्हणाल्या होत्या शर्मिला ठाकरे?
माध्यमांशी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, “त्यांना तेवढच करायचं आहे. दुसरे पक्ष फोडायचे. त्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना. दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष, RSS विश्व हिंदु परिषदेत काम करणारी खूप चांगली मुलं आहेत, होती. कुठे आहेत ती आता? त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का दुसऱ्यांच्या आतापर्यंत? तिथे ममता बॅनर्जीचा पक्ष फोडला, इथे उद्धवचा फोडला, शरद पवार साहेबांचा फोडला. त्याच्यापेक्षा आता तुम्ही आम्ही कसं आमचा पक्ष फोडल्यानंतर आमची नवीन मुलं उभी करतो. अरे तुम्ही तेवढं तर दाखवा. करा चांगली मुलं. ती पण काम करणारी असतात. त्यांना मोठं करा तुम्ही. मला काही पाहायचं नाहीये. तुम्ही एवढे शक्तीशाली 12 वर्ष सत्तेत आहात ना तुम्ही तुमचे कार्यकर्त्ये, आमदार आणि खासदार तुम्ही निर्माण करा ना. तेवढी तर दाखवा. भारताची वाट लावली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली आहे. निदान तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना तरी मोठं करा.”
“पेट्रोल 100 रुपयांच्या वरती गेलंय. ज्या समस्येसाठी भाजप रस्त्यावर येऊन आंदोलन करत होती 12 वर्षांपूर्वी त्याच्याबद्दल कोणी चकार शब्दही बोलायला तयार नाहीये. मला तर तुम्हाला एक नवीन सांगायचं आहे. माझ्याकडे काल एक ज्वेलर्स आले होते. कोकणार राहतात, मराठी आहेत त्यांनी सांगितली चिपी एअरपोर्ट बंद झाले. तुम्ही कोणीच यावर आवाज उठवत नाही. एवढे कोटी आणि आपल्या टॅक्सचे पैसे खर्च करुन 12 वर्षांनी आता काढायला सांगितलं आहे मोदी साहेब आल्या पासून किती नवे एअरपोर्ट झाले आणि त्यामध्ये किती बंद झाले” असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.